Farmer Agricultural News farmers testing germination capacity of soybean seeds Nagar Maharashtra | Agrowon

नगर : शेतकरी घरीच तपासत आहेत सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

नगर  ः खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता गृहित धरुन कृषी विभागाने या बियाण्याचा शेतकऱ्यांकडे शोध सुरु केला आहे. याशिवाय ज्यांच्याकडे गतवर्षीचे सोयाबीन बियाणे म्हणून वापरता येऊ शकते त्याची घरीच उगवण क्षमता तपासून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले त्यानुसार शेतकरी सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासत आहेत.

नगर  ः खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता गृहित धरुन कृषी विभागाने या बियाण्याचा शेतकऱ्यांकडे शोध सुरु केला आहे. याशिवाय ज्यांच्याकडे गतवर्षीचे सोयाबीन बियाणे म्हणून वापरता येऊ शकते त्याची घरीच उगवण क्षमता तपासून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले त्यानुसार शेतकरी सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासत आहेत.

नगर जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ५८ हजार २८२ हेक्टर आहे. गेल्यावर्षी ८८ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. बियाणे बदलाचा दर साधारण पन्नास टक्के आहे. यंदा जिल्ह्यात ७९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होईल असा अंदाज गृहित धरुन बियाणे बदलाच्या दरानुसार ५० टक्के गरजेनुसार ३० हजार क्विंटल बियाणाची गरज आहे. त्यातील आतापर्यत १३ हजार १७७ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला आहे.

त्यामुळे पुरवठ्याचा विचार करता बियाणांचा तुटवडा जाणवणार असल्याचे गृहित धरुन कृषी विभागाने सोयाबीन बियाण्याचा शेतकऱ्यांकडे शोध सुरु केला आहे. याशिवाय ज्यांच्याकडे गतवर्षीचे सोयाबीन बियाणे म्हणून वापरता येऊ शकते त्याची घरीच उगवण क्षमता तपासून घ्यावी, असे अवाहन कृषी विभागाने केले त्यानुसार शेतकरी बियाण्याची उगवण क्षमता तपासत आहेत.
 
अशी करा तपासणी
१०० बिया ओल्या कापडात, गोणपाटात मोड येईपर्यंत साधारण २४ तास ठेवाव्यात. त्यानंतर तपासणी करुन किती बियांना मोड आले आहेत ते तपासावे. त्यातील जेवढे बियाणे उगवेल त्यानुसार बियाणे उगवण क्षमता लक्षात येते. एकरी साधारण ७५ बियाणे वापरले जातात. मात्र उगवण क्षमता कमी आली तर त्या तुलनेत बियाणे वाढ केली जाणार असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...