Farmer Agricultural News farmers waiting for crops panchnama Jalgaon Maharashtra | Agrowon

खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके उभीच

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

जळगाव ः पंचनामे करताना पिकांची नेमकी स्थिती लक्षात यावी, यंत्रणांकडून नुकसानीच्या आकडेवारीचा घोळ व्हायला नको, यासाठी शेतकऱ्यांनी मळणीवर आलेली  पिके तशीच उभी ठेवली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पंचनाम्यांची प्रतीक्षा आहे. 

जळगाव  ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण राहिलेले पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. यातच अलीकडेच प्रशासनाने सर्वच पिकांच्या पंचनाम्यांचे आदेश  जारी केले आहेत. पंचनामे करताना पिकांची नेमकी स्थिती लक्षात यावी, यंत्रणांकडून नुकसानीच्या आकडेवारीचा घोळ व्हायला नको, यासाठी शेतकऱ्यांनी मळणीवर आलेली ज्वारी, सोयाबीन, वेचणीवरील कापूस आदी पिके तशीच उभी ठेवली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पंचनाम्यांची प्रतीक्षा आहे. 

उडीद, मुगाचे पंचनामे अपूर्ण असतानाच पाऊस सुरू झाला. महसूल व कृषी यंत्रणेने काम थांबविले. बुधवारपूर्वी (ता.२३) जोरदार पाऊस सुरूच होता. यादरम्यान ज्वारी, सोयाबीन, बाजरी, पूर्वहंगामी कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले. या पिकांच्या पंचनाम्यांची मागणी सुरू झाली. अशातच या पिकांचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश संबंधित जिल्ह्यात पालकमंत्री व प्रशासनाने दिले. यानंतर गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला पंचनामे सुरू झाले. त्यासंबंधी प्रशासनाने माहितीदेखील जारी केली.

परंतु, अनेक भागांत तलाठी, कृषी सहायक पोचलेले नाहीत. कामांचा अतिरिक्त भार, रिक्त पदे आदी सबबी प्रशासन देत आहे. परंतु, पंचनामे होण्यापूर्वीच पिकांची मळणी, कापणी किंवा पीक मोडून पूर्वमशागत केली तर पंचनामा होणार नाही, आपल्याला मदत मिळणार नाही, यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, ज्वारी, बाजरी आदी पिकांची कापणी, मळणी सुरू केलेली नाही. पिके तशीच उभी आहेत.

गेले चार दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश व कोरडे वातावरण खानदेशात अनेक भागात आहे. अधूनमधून काळे ढग जमा होतात. पण पाऊस कोसळत नसल्याने तेवढा दिलासा मिळत आहे. अशा स्थितीत पंचनामे तातडीने उरकून नुकसानीची नेमकी टक्केवारी, वस्तुस्थितीचा अहवाल प्रशासनाने तयार करावा, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

यंदा अतिपावसात पिके हातची गेली. त्यामुळे शासनाकडून तातडीने भरपाई मिळायला हवी. त्यासाठी पंचनामे या आठवड्यात पूर्ण करून अंतिम अहवाल तयार करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

प्रतिक्रिया
पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा. कारण शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. पंचनाम्यांअभावी शेतात पिके तशीच उभी आहेत. कृषी सहायक, तलाठी मंडळी गावाकडे फिरकत नाही. पंचनामे वस्तुस्थितीनुसार झाले पाहिजेत. 
- विश्राम पाटील, शेतकरी, पारोळा, जि.जळगाव.


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...