Farmer Agricultural News farmers waiting for damaged crops panchanama Nagar Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे नाहीच

टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

नगर  ः सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाले. आठ दिवसांपूर्वीच पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे प्रशासनाने सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात दोन दिवसांपूर्वी आदेश दिले असल्याची माहिती मिळाली आहे.  मात्र अजूनही पंचनामे झाले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाले. आठ दिवसांपूर्वीच पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे प्रशासनाने सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात दोन दिवसांपूर्वी आदेश दिले असल्याची माहिती मिळाली आहे. दोन दिवसांत तातडीने पंचनाम्याची माहिती द्यावी, असे कृषी विभागाने कळवले आहे. मात्र अजूनही पंचनामे झाले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

नगर जिल्ह्यात यंदा चांगल्या पावसाने खरिपाची पिके जोमात आली. शेतकरी समाधानी होते. मात्र गेल्या महिनाभरापासून सतत पाऊस सुरु असल्याने जोमात आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. कापूस, काढणीला आलेली व काढणी केलेली बाजरी, सोयाबीन, मका, भूईमुगाचे मोठे नुकसान झाले. तुरीलाही फटका बसला. कांदा, भाजीपाला जागेवर सडला. निचरा होत नसलेल्या शेतात पाणी साठवून राहिले आहे. पाऊस थांबून चार दिवस झाले तरी अजूनही अनेक ठिकाणी शेतांत पाणी साचलेले आहे. कापूस, बाजरी, भूईमुगाचे अनेक भागांत ८० टक्के नुकसान झाले आहे.  

पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात असल्याचे आठ दिवसांपुर्वीच सांगितले गेले होते. मात्र अजूनही नुकसान झालेल्या ५० टक्के शेतकऱ्यांच्या शेतात कृषी व अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी पंचनाम्यासाठी पोचलेले नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार पंचनामे करण्याचे आदेश नसल्याने अनेक तालुक्यांत पंचनामे झालेच नाहीत. आता दोन दिवसांपुर्वी आदेश दिल्याची माहिती आहे. दोन दिवसांत नुकसानीची माहिती कृषी विभागाने मागितली आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी प्रा. जयहिंद खेडकर यांनी केली आहे.    

खरिपाची पेरणी झाल्यानंतर निकृष्ट बियाणे पुरवठा झाल्याने बियाणे उगवले नाही आणि अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. बियाणे उगवले नसल्याची तक्रार झाल्यावर संबंधित शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तालुकास्तरीय समितीने पंचनामे केल्यानंतर त्यावर तोडगा काढण्याचा नियम. मात्र वाट पाहून दुबार पेरणी केल्यावरही पंचनाम्याला कृषी विभागाचे अधिकारी पोचले नव्हते. आताही पाऊस सुरु आहे. कापूस वेचणीला सुरवात झाली आहे. वेळेत पंचनामे झाले नाही तर नुकसान कसं ग्राह्य धरणार, त्यामुळे यावेळीही ‘बैल गेला...’ अशी स्थिती होणार नाही ना? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

प्रतिक्रिया
यंदा सततच्या पावसाने कापूस, सोयाबीनचे ८० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. पंचनामे करत असल्याचे कृषी विभाग सांगत असला तरी अजून तरी आमच्या शेतात कोणीही पोचलेले नाही. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन मदत मिळणे गरजेचे आहे. 
- दिपाली नवगिरे, शेतकरी, पानेगाव, ता. नेवासा, जि, नगर. 


इतर ताज्या घडामोडी
धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यताभंडारा : खरीप हंगामातील धान केंद्र सुरू...
आम्ही तुमच्यासोबत: मुख्यमंत्रीसोलापूर ः सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन...
कृषी विद्यापीठ कर्मचारी करणार वेतन...नागपूर: सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची...
राज्याने जबाबदारी झटकू नये: देवेंद्र...बारामती, जि. पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगातकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने...
आटपाडी तालुक्यात चार वेळा अतिवृष्टीआटपाडी, जि. सांगली : बॅंका, विकास सेवा सोसायट्या...
डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा...मुंबई: डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार...
संत्रापट्ट्यासाठी अनुदानाचे निकष बदलाअमरावती : संत्राबाग कीड-रोग रोगमुक्त ठेवण्यासाठी...
अकोल्यात ज्वारीच्या कणसातून निघाले कोंबअकोला ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल...
जळगावात खपली गहू पेरणी वाढणारजळगाव ः आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून...
अकोट येथे उडीद पिकाची प्रतिकात्मक होळीअकोला ः पावसाने पिकांची दाणादाण उडविली आहे....
खानदेशात सोयाबीनचे अनेक शेतकऱ्यांना...जळगाव ः खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा बऱ्यापैकी...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे...नाशिक : ‘‘अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे...
पुणे जिल्ह्यात पावसाने वाढवली चिंतापुणे ः परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या...
राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या...बीड : ‘‘परतीच्या जोरदार पावसांने खरीप पिकांचे...
कर्ज काढू, पण मदत करू ः वडेट्टीवारनांदेड : ‘‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या...
विविध प्रकल्प उभे राहण्यासाठी शेतकरी गट...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यामध्ये पोकरा, स्मार्ट, एक...
अधिक उत्पादन देणारे एरंडी, हरभरा पिकवा...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणारे एरंडी...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाईसाठी...सोलापूर ः ‘‘राज्य शासनाकडून जिल्ह्यातील...
नगरमध्ये कांदा आठ हजार रुपये क्विंटलनगर ः नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात तेजी कायम...