कांदा दरवाढीसाठी शेतकरी लिहिताहेत पंतप्रधानांना पत्र

नाशिक : केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा कांदा थेट २० रुपये प्रतिकिलो या दराने खरेदी करावा, या प्रमुख मागणीसाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने २२ मेपासून राज्यव्यापी पत्र आंदोलन सुरू केले आहे. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने त्यांच्या पत्त्यावर राज्यातील कांदा उत्पादक आपापल्या गावातील टपाल कार्यालयांमधून हे पत्र पाठवत आहे. या आंदोलनास राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.
देवळा येथील टपाल कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र टाकण्यासाठी जमलेले कांदा उत्पादक

उन्हाळ कांद्याला प्रतिकिलो प्रमाणे १० ते ११ रुपये इतका उत्पादन खर्च येत असताना कांद्याचे दर सरासरी ६ ते ७ रुपये इतके खाली आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकारने कांदा २० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावा ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात नाशिक जिल्ह्यासह परभणी, वाशीम, अकोला, बीड, पुणे, सातारा, सोलापूर, नगर, धुळे, औरंगाबाद, जळगाव आदी जिल्ह्यांमधून हजारो पत्र कांदा उत्पादकांनी पंतप्रधान मोदी यांना पाठविले आहेत. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करीत हे आंदोलन करण्यात येत आहेत. सुरुवातीला २२ ते २८ मे या कालावधीत हे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र काही ठिकाणी पत्र उपलब्धता नाहीत तसेच संथ गतीने सुरू असलेली टपाल सेवा यामुळे ४ जूनपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com