Farmer Agricultural News fertilizers availability status for kharip Nagar Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात गतवर्षीच्या शिल्लक खतांवरच यंदाच्या खरिपाची मदार

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

नगर  ः नगर जिल्ह्याला खरिपासाठी २ लाख ९१ हजार टन खतांची गरज आहे. तशी मागणीही केलेली आहे. मात्र त्यातील आतापर्यंत १९ हजार ६६२ टन खतांचा पुरवठा झाला आहे.

नगर  ः नगर जिल्ह्याला खरिपासाठी २ लाख ९१ हजार टन खतांची गरज आहे. तशी मागणीही केलेली आहे. मात्र त्यातील आतापर्यंत १९ हजार ६६२ टन खतांचा पुरवठा झाला आहे. गेल्यावर्षीची १ लाख दोन हजार टन खते शिल्लक आहेत. दोन्ही मिळून सध्या ४० टक्के खते उपलब्ध आहेत. त्यामुळे यंदाच्या खरिपाची गतवर्षीच्या खतांवरच मदार असल्याचे दिसून येत आहे.

नगर जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र चार लाख ७८ हजार ६३८ हेक्टर आहे. यंदा पाच लाख ८३ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावर पेरणी व कापूस लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला असून त्यानुसार नियोजन केले जात आहे. खरिपासाठी जिल्ह्याला २ लाख ९१ हजार टन खतांची गरज आहे. त्यानुसार कृषी विभागाने मागणीही केलेली आहे. मात्र गतवर्षीचे एक लाख दोन हजार टन खत शिल्लक आहे.

यंदा आतापर्यंत मागणीच्या सात टक्के म्हणजे १९ हजार ६६२ टन खत पुरवठा झाला आहे. गतवर्षीचे शिल्लक खत धरुन ४० टक्के म्हणजे १ लाख २१ हजार ५८३ टन खत आतापर्यंत उपलब्ध झालेले आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. चांगला पाऊस झाला तर खरिपाच्या पेरण्यांना पंधरा दिवसांत सुरवात होईल. त्यानुसार खत पुरवठा होणे अपेक्षित असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्याच्या उपलब्ध खताचा विचार करता शिल्लक खतांवर खरिपाची मदार असल्याचे दिसत आहे.

बांधावर बियाणे, खताचे काय?
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी करु नये यासाठी कृषी विभागाने बांंधावर खते देणार असल्याचे सांगितले. मात्र नगर जिल्ह्यात एखाद्या तालुक्याचा अपवाद वगळता अजूनही बांधावर खते देण्याचे नियोजन झाल्याचे दिसत नाही. आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांनी नोंदणी करावी एवढेच आवाहन केले जात आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून कसलेही मार्गदर्शन मिळताना दिसत नाही.

एप्रिल-मे मध्ये पुरवठा झालेले खत (टन) ः युरिया ः ७३५८, डीएपी ः २५८३, एमएपी ः ४१४, एसएपी ः २१२२, संयुक्त खते ः ७१८६. 
 


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...