नांदुरा तालुक्यात चार शेतकऱ्यांच्या नावे ५१४ क्विंटल खतांची विक्री

बुलडाणा ः नांदुरा तालुक्यातील एका कृषी निविष्ठा विक्रेत्याने चार शेतकऱ्यांच्या नावे सुमारे ५१४ क्विंटल म्हणजेच एक हजार बॅगपेक्षा अधिक रासायनिक खतांची विक्री केल्याची बाब समोर आली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बुलडाणा  ः नांदुरा तालुक्यातील एका कृषी निविष्ठा विक्रेत्याने चार शेतकऱ्यांच्या नावे सुमारे ५१४ क्विंटल म्हणजेच एक हजार बॅगपेक्षा अधिक रासायनिक खतांची विक्री केल्याची बाब समोर आली आहे. याबाबत विक्रेत्यानेच कृषी विभागाला दिलेला अहवाल व्हायरल झाल्यानंतर जिल्हाभर एकच खळबळ उडाली आहे. 

बुधवारी (ता.२९) जिल्ह्यातील कृषी यंत्रणेने तातडीने संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीतून काय निष्पन्न होते याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  

सध्या युरिया मिळत नसल्याने जिल्ह्यात एकच गोंधळ उडालेला आहे. शेतकऱ्यांना युरियाची एक बॅग मिळवण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागते. अनेकांना तर युरिया मिळतही नाही. असे असताना नांदुरा तालुक्यातील ग्रामीण भागातील एका विक्रेत्याकडून चार शेतकऱ्यांना सुमारे ५०० क्विंटलपेक्षा अधिक युरिया व इतर खत विक्री केल्याचा शासकीय अहवाल समाज माध्यमात व्हायरल झाला. युरिया मिळत नसल्याने नांदुरा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना युरियाची एक बॅग मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

दुसरीकडे याच तालुक्यातील एका विक्रेत्याने चक्क चार शेतकऱ्यांच्या नावे सुमारे ५१४ क्विंटल म्हणजे १००० बॅगपेक्षा अधिक युरिया व इतर रासायनिक खतांची विक्री केली. ही माहिती विक्रेत्यानेच कृषी विभागाकडे प्रपत्रात दिल्याचे समोर आले. हा प्रकार माध्यम प्रतिनिधींपर्यंत पोचताच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सावरासावर सुरू केली.

बुधवारी (ता.२९) जिल्ह्यातील कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी संबंधित विक्रेत्याकडे पोचले आणि त्यांनी संपूर्ण रेकॉर्डची तपासणी सुरू केली आहे. या हंगामात केलेल्या खत विक्रीच्या तपशिलाची जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक बॅगच्या विक्रीची सत्यता पडताळून पाहिली जाणार आहे, अशी माहिती कृषी पथकातील एका अधिकाऱ्याने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com