Farmer Agricultural News fertilizers seeds will available on the farm Satara Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बांधावर खते,बियाणे दिली जाणार : महेश झेंडे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मे 2020

सातारा ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घरातील सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी घेऊन त्याचा पेरणीसाठी जास्तीत जास्त वापर करावा. सोयाबीन चांगली उगवण होण्यासाठी बीजप्रक्रिया आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांच्या मागणीनूसार शेताच्या बांधावर खते पोचवली जाणार आहेत, यासाठी शेतकऱ्यांनी गट किंवा समूह तयार करून मागणी केल्यास त्यांना कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून बियाणे, खते दिली जाणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी महेश झेंडे यांनी सांगितले.

सातारा ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घरातील सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी घेऊन त्याचा पेरणीसाठी जास्तीत जास्त वापर करावा. सोयाबीन चांगली उगवण होण्यासाठी बीजप्रक्रिया आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांच्या मागणीनूसार शेताच्या बांधावर खते पोचवली जाणार आहेत, यासाठी शेतकऱ्यांनी गट किंवा समूह तयार करून मागणी केल्यास त्यांना कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून बियाणे, खते दिली जाणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी महेश झेंडे यांनी सांगितले.

पाटण (जि. सातारा) येथे सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी कार्यक्रमात श्री. झेंडे बोलत होते. यावेळी कराड उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, तालुका कृषी अधिकारी भुपाल बुधावले, मंडल कृषी अधिकारी अभिजीत पाटील, कृषी पर्यवेक्षक मोहन निकम, राजेंद्र जाधव, कृषी सहायक संतोष चव्हाण, सुरज बागुल, नितिन लोखंडे आदी उपस्थित होते. श्री. झेंडे म्हणाले,की आंब्याच्या परंपरागत जातींऐवजी रत्ना, सिंधू, आम्रपाली यासारख्या जातीची लागवड करावी. हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रकाश सापळे लावावेत. यावेळी त्यांनी रासायनिक खतांचा वापर, एकात्मिक किड व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. पाटण येथे चंद्रकांत चौधरी यांच्या शेतातील हुमणी नियंत्रक सापळा प्रात्याक्षिक घेण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...