पीक विम्यासाठी राज्यभरातून ७२ लाख अर्ज

पुणे : पंतप्रधान पीक विमा योजनेत आत्तापर्यंत ७२ लाखांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. यात ६९ लाख बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. सर्वांत जास्त अर्ज बीड जिल्ह्यातून आले आहे. योजनेत सहभागासाठी उद्या (ता.३१) अखेरचा दिवस असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पीक विम्यासाठी राज्यभरातून ७२ लाख अर्ज
पीक विम्यासाठी राज्यभरातून ७२ लाख अर्ज

पुणे : पंतप्रधान पीक विमा योजनेत आत्तापर्यंत ७२ लाखांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. यात ६९ लाख बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. सर्वांत जास्त अर्ज बीड जिल्ह्यातून आले आहे. योजनेत सहभागासाठी उद्या (ता.३१) अखेरचा दिवस असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

योजनेत अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नसल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याची सक्ती टाळायची असल्यास अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर घोषणापत्र द्यावे लागेल, असे आधीच सांगितले गेले होते. असे घोषणापत्र नसल्यास शेतकऱ्यांच्या खात्यातून बॅंका परस्पर विमा हप्ता कापणार आहेत. उर्वरित इच्छुक बिगर कर्जदार शेतक-यांना शुक्रवारपर्यंत अर्ज दाखल करावेच लागतील. कारण, मुदतवाढीची मागणी फेटाळण्यात आली आहे. 

पीकविमा योजनेकरिता अर्ज दाखल करण्यात बीड जिल्ह्यातील शेतकरी आघाडीवर आहेत. मंगळवार अखेर (ता.२८)बीडमधील १४.३२ लाख शेतक-यांनी अर्ज दाखल केले. नांदेडमध्ये ७.९७ लाख, जालन्यात ६.२५ लाख, उस्मानाबादेत ८.२३ लाख, परभणीत ५.७४ लाख तर औरंगाबाद जिल्ह्यात ६.३९ लाख शेतक-यांनी अर्ज दाखल केले आहेत. हिंगोलीत २.४४ लाख, बुलडाण्यातून २ लाख, सोलापुरात २.१५ लाख, यवतमाळमध्ये ३.१४ लाख, नगरमधून २.३८ लाख, वाशिममधून १.५५ लाख, अकोल्यात १.५२ लाख, लातूरमध्ये २.८० लाख, अमरावती जिल्ह्यात १.१३ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. 

कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून मात्र कमी विमा अर्ज दाखल झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अवघे ८३०, सिंधुदुर्गात १२९५, रत्नागिरीत ३९४, रायगडमधून २७२२, ठाण्यात ४३१५, पालघरमध्ये १५ हजार,  साताऱ्यात ३७१७, सांगलीतून ४९ हजार शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत. 

खानदेशात नंदुरबारमधून ३०१९, जळगावमध्ये ४९ हजार, धुळ्यात २७ हजार, नाशिकमध्ये १.८३ लाख, तसेच पूर्व विदर्भात गोंदियातून ९८३९, भंडाऱ्यातून ४.३९ लाख, चंद्रपूरमधून २३ हजार, गडचिरोलीतून ९९३९ तर नागपूर जिल्ह्यातील ८७०० शेतकऱ्यांनी ऑनलाइन विमा अर्ज भरले आहेत.  

सेतु कार्यालयाची मदत न घेता शेतकऱ्यांकडून स्वतः विमा अर्ज दाखल करण्यात काही जिल्हे आघाडीवर होते. मात्र यंदा राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवरील ‘फार्मर कॉर्नर’व्दारे थेट नोंदणी करता येत नव्हती. अर्थात, अजून दोन दिवस शिल्लक असल्यामुळे भरपूर अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. प्रचार चांगला, पण काही तालुक्यांत अर्ज कमी कृषी विभागाने यंदा पीकविमा योजनेचा चांगला प्रचार केला. मात्र, ‘कोरोना’मुळे सुरू असलेला लॉकडाउन, सर्व्हर डाउनच्या घटना, जनसुविधा केंद्रांवर पैसे न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या अर्जांचे ‘फिडिंग’ उशिरा होणे या कारणांमुळे काही तालुक्यांमध्ये कमी अर्ज भरले गेले आहेत.    अशी आहे स्थिती

  • बीड जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज दाखल. 
  • कोकण व पश्चिम महाराष्ट्रातून कमी अर्ज दाखल . 
  • येत्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याचा अंदाज
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com