Farmer Agricultural News fisherman become in trouble due to corona issue Pune Maharashtra | Agrowon

इंदापुरातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 एप्रिल 2020

मी अनेक वर्षांपासून पळसदेव येथे मासेमारी व्यवसाय करतो. सर्व मासे इंदापुरातील मार्केटमध्ये विकतो. कमी अधिक दर बघता रोज २०० ते ५०० रुपये मिळतात. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. ‘कोरोना’मुळे मार्केट बंद असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 
- आजिनाथ भोई, मत्स्य व्यावसायिक, पळसदेव, जि. पुणे.

पुणे  ः  कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी सर्वत्र लॉकडाउन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार, बाजारपेठा बंद आहे. यामध्ये इंदापूर तसेच जिल्ह्यातील काही ठिकाणाची मच्छीमार्केट बंद आहेत. यामुळे उजनी धरणात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मासेमारी बंद असल्याने त्यावर उपजीविका करणारे मच्छीमार अडचणीत आले आहेत.

पुणे व नगर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या काठावरील पळसदेव, डाळज क्र. एक, दोन, तीन, भादलवाडी, कुंभारगाव, तक्रारवाडी, भिगवण, डिकसळ, खानवटे, राजेगाव, खेडनगर, गणेशवाडी, बाभुळगाव, कात्रज, कोंढार चिंचोली, पोमलवाडी आदी गावांमधील अनेक मच्छीमार उजनीत मासेमारी करून आपली गुजराण करतात. मात्र, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील मासळी बाजार २० मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने घेण्यात आला आहे. सध्या येथे २० ते २५ अडतदार आहेत. अनेक ठिकाणांहून येथे मासे विक्रीसाठी येतात. त्यामुळे दररोज येथे पाच ते सहा टन मासळीची आवक होत असते. परंतु कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता मासळी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्केट बंद असल्याने मासेमारी सध्या ठप्प आहे. त्यामुळे दैनंदिन खर्चासाठी लागणारा पैसा मिळवायचा कुठून असा प्रश्न या मच्छीमारांसमोर उभा राहिला आहे. 

याबाबत स्थानिक मच्छीमार बापूराव नगरे म्हणाले, की कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मासळी बाजार बंदचा निर्णय घेतला आहे. तो सर्वांना मान्य आहे. परंतु, पंधरा दिवस बाजार बंद राहिल्याने मच्छीमारी करणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे बाजार समितीने लवकर निर्णय घेऊन मार्केट सुरू करावे. 
 
इंदापूरतील मार्केटमध्ये चिलापी माशाला अधिक मागणी आहे. मी रोज ५० ते ६० किलो माशांची विक्री करत होतो. चांगला दर मिळाल्यास चांगले उत्पन्न मिळत होते. परंतु, पंधरा दिवसांपासून भिगवण व इंदापूर दोन्ही मच्छिमार्केट बंद असल्याने आमच्यासमोर आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत, असे मत्स्य व्यावसायिक 
नितीन रामकिसन नगरे यांनी सांगितले.

तालुक्यात भिगवण व इंदापूर ही दोन्ही मच्छीमार्केट राज्यात प्रसिद्ध आहेत.‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर २० मार्चपासून मच्छिमार्केट बंद आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या अडचणी वाढल्या आहेत, इंदापूर बाजार समितीचे सहाय्यक सचिव
 वैभव दोशी यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः निसर्ग चक्रीवादळ आणि अति पावसाचा...
नुकसानग्रस्तांना मदतीबाबत योग्य तो...पुणे  ः निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे...
मंजुर येथील बंधाऱ्याचा भराव पहिल्याच...नगर  ः मंजुर (ता.कोपरगाव) येथील कोल्हापुर...
जत तालुक्‍याच्या पूर्व भागात चारा टंचाईसांगली  ः पावसाने दिलेली दडी, वाया गेलेला...
भुईबावडा परिसरातील तीन गावांना ...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील भुईबावडा (ता.वैभववाडी)...
निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी...रत्नागिरी  : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले...
अकोल्यात कंटेनमेंट झोन वाढणार नाहीत...अकोला  ः अकोल्यात कोरोना बाधितांची वाढत...
कर्नाटकी बेंदुरावर कोरोनाचे सावटकोल्हापूर:  कर्नाटकी बेंदूर उद्या (ता.७)...
अटींवरच शेतकऱ्यांना वर्ध्यात कापूस...वर्धा  ः वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या...
चंद्रपूर जिल्ह्यात पंधरा हजारांवर ...चंद्रपूर ः शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची हमी राज्य...
शेतकऱ्यांना प्रतीक्षा फळपीक विमा...नगरः मृगबहारासाठी पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत...
पुणे जिल्ह्यातील गावांतील आठवडे बाजार...पुणे: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडीच...
माती परीक्षणानुसार करा खतांचे नियोजनमाती परीक्षण हा पीक उत्पादनाचा आत्मा आहे. आगामी...
सुधारित तंत्राने करा शेवगा लागवडलागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील अंतर २.५ ते ३...
भात पुर्नलागवडीची चारसूत्री पद्धतीसूत्र १  भातपिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व...
हिंगोलीत हळद ४८०० ते ५२०० रुपये...हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
संतुलित खत व्यवस्थापनावर द्या भरमाती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...