बुलडाण्यात मक्यावर ५ ते १० टक्के अमेरिकन लष्करी अळी 

बुल़डाणाजिल्ह्यात या हंगामात मक्याची सुमारे १८ हजार हेक्टरवर लागवड झाली असून पीकवाढीच्या अवस्थेत आहे. मात्र काही ठिकाणी या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा पाच ते दहा टक्के प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येत आहे.
 बुलडाणा जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे
बुलडाणा जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे

बुल़डाणा  ः जिल्ह्यात या हंगामात मक्याची सुमारे १८ हजार हेक्टरवर लागवड झाली असून पीकवाढीच्या अवस्थेत आहे. मात्र काही ठिकाणी या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा पाच ते दहा टक्के प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीपासून कीड नियंत्रणासाठी फवारण्या घेण्यास सुरुवात करावी लागली आहे. 

विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात खरिपात सर्वाधिक २० हजार हेक्टरवर मक्याची लागवड केली जाते. मागील दोन वर्षांपासून दरवेळी लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत आहे. मागील हंगामात अनेक शेतकऱ्यांनी या अळीच्या उपद्रवामुळे पीक मोडले होते. यंदा मक्याची लागवड १ ते १० जून दरम्यान झालेली असून हे पीक एक महिना कालावधीचे होत आहे. पीक १५ दिवसांचे होताच पाने व पोंग्यामध्ये अळी दिसून येत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी प्रादुर्भावाचे प्रमाण कमी-जास्त आहे. कृषी विभाग अद्याप अळीचा प्रादुर्भाव तितका नसल्याचे सांगत आहे. 

या हंगामात मोताळा तालुक्यात ३२६१ हेक्टरवर मक्याची लागवड झाली आहे. अद्याप या अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून आलेला नाही. कृषी अधिकारी, कर्मचारी कृषी संजीवनी सप्ताहाच्या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना याबाबत मार्गदर्शन करीत आहेत, असे मोताळा तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी सांगितले. धाड परिसरात मक्याचे सर्वाधिक क्षेत्र आहे. या भागात सध्या पिकावर पाच ते १० टक्के प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव आहे. आम्ही चार एकरांत मका लागवड केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सध्या अळीचे प्रमाण कमी असले तरी प्रादुर्भाव दिसून आल्याने आठ दिवसांपूर्वी फवारणी करावी लागली. सध्या अळीचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे.  -अंकुश गुजर, शेतकरी, धाड, जि. बुलडाणा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com