सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती 

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक मार्ग पाण्याखाली गेले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.
कसाल येथील अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढले असून घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे.
कसाल येथील अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढले असून घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे.

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक मार्ग पाण्याखाली गेले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. काही मार्गांवर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी पुराचे पाणी शेती, बागायतींमधून वाहत आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

सिंधुदुर्गात मंगळवारपासून (ता.७) मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी रात्री पावसाचा जोर अधिकच वाढला. बुधवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील नदीनाल्यांना पूर आला. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या कसाल येथील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले. या संपूर्ण परिसराला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. मुंबई-गोवा महामार्गापासून अवघ्या काही अंतरावरून पुराचे पाणी वाहत आहे. पुराचे पाणी वाढत असल्यामुळे येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. दुपारपर्यंत अर्चना देवीदास जाधव, सुप्रिया देवीदास जाधव, योगेंद्र जाधव यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, अन्य घरांमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून सुरू होते. 

पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. ओरोस येथील खिश्‍च्रनवाडी पूल, पणदूर-आवळेगाव मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे या गावांचा सपंर्क तुटला. कुडाळ तालुक्यातील आबेंरी पूलदेखील पुराच्या पाण्याखाली गेला. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला असून येथील २७ गावांचा संपर्क तुटला आहे. कणकवली-आचरा मार्गावर पुराचे पाणी असून, या मार्गावर वडाचे झाडदेखील कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकदेखील ठप्प झाली.

मालवण तालुक्यातील भगवंतगड ते बांधीवडे मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. ओरोस येथील जैतापकर कॉलनीमधून पुराच्या पाण्याचा प्रवाह वाहत आहे. कांदळगाव-मसुरे मार्गावर पुराचे पाणी आले आहे. मुंबई-गोवा महामार्गवर बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ओरोसच्या पुलावर फूटभर पाणी साचले होते. कसाल, पणदूर, ओसरगाव या परिसरातील अनेक शेती, बागायतींमधून पुराच्या पाण्याचा प्रवाह वाहत असल्यामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.  ‘तिलारी’तून विसर्गाची शक्यता  तिलारी आंतरराज्य प्रकल्पात ७७.२४ टक्के पाणीसाठा झाला असून, बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १६४ मि.मी. पावसाची नोंद झाली. धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून गरज भासल्यास धरणातून विसर्ग करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षता म्हणून प्रशासनाने तिलारी नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com