Farmer Agricultural News flood situation in district sindhudurga Maharashtra | Page 2 ||| Agrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 जुलै 2020

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक मार्ग पाण्याखाली गेले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक मार्ग पाण्याखाली गेले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. काही मार्गांवर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी पुराचे पाणी शेती, बागायतींमधून वाहत आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

सिंधुदुर्गात मंगळवारपासून (ता.७) मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी रात्री पावसाचा जोर अधिकच वाढला. बुधवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील नदीनाल्यांना पूर आला. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या कसाल येथील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले. या संपूर्ण परिसराला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. मुंबई-गोवा महामार्गापासून अवघ्या काही अंतरावरून पुराचे पाणी वाहत आहे. पुराचे पाणी वाढत असल्यामुळे येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. दुपारपर्यंत अर्चना देवीदास जाधव, सुप्रिया देवीदास जाधव, योगेंद्र जाधव यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, अन्य घरांमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून सुरू होते. 

पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. ओरोस येथील खिश्‍च्रनवाडी पूल, पणदूर-आवळेगाव मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे या गावांचा सपंर्क तुटला. कुडाळ तालुक्यातील आबेंरी पूलदेखील पुराच्या पाण्याखाली गेला. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला असून येथील २७ गावांचा संपर्क तुटला आहे. कणकवली-आचरा मार्गावर पुराचे पाणी असून, या मार्गावर वडाचे झाडदेखील कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकदेखील ठप्प झाली.

मालवण तालुक्यातील भगवंतगड ते बांधीवडे मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. ओरोस येथील जैतापकर कॉलनीमधून पुराच्या पाण्याचा प्रवाह वाहत आहे. कांदळगाव-मसुरे मार्गावर पुराचे पाणी आले आहे. मुंबई-गोवा महामार्गवर बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ओरोसच्या पुलावर फूटभर पाणी साचले होते. कसाल, पणदूर, ओसरगाव या परिसरातील अनेक शेती, बागायतींमधून पुराच्या पाण्याचा प्रवाह वाहत असल्यामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

‘तिलारी’तून विसर्गाची शक्यता 
तिलारी आंतरराज्य प्रकल्पात ७७.२४ टक्के पाणीसाठा झाला असून, बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १६४ मि.मी. पावसाची नोंद झाली. धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून गरज भासल्यास धरणातून विसर्ग करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षता म्हणून प्रशासनाने तिलारी नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
बुलडाणा जिल्ह्यातील १४ हजार शेतकरी मका...बुलडाणा ः जिल्ह्यातील १८ हजार ६८० शेतकऱ्यांनी मका...
दूध दरप्रश्‍नी राज्याचे केंद्र सरकारला...मुंबई: राज्यातील दूध दराचा तिढा सोडवण्यासाठी...
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
नव्या शिक्षणाची मांडणी शरद जोशींच्या...शरद जोशी जे म्हणतात ते महत्वाचे आहे की...
रेशीम शेतीला संजीवनीकोरोना लॉकडाउनचा फटका दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन...
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...