Farmer Agricultural News flower producers become in trouble due to corona issue Nagpur Maharashtra | Agrowon

विदर्भात फुलांची उलाढाल ठप्प

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

रोज १५० किलो फुले तोडून फेकावी लागत आहे. फुले तोडली नाही तर झाडाच्या उत्पादनावर परिणाम होतो. या नुकसानीची भरपाई करण्यासोबत रोजच्या जगण्यासाठी पैसा कोठून आणावा असा प्रश्‍न आहे.
- मोहन चोरे, फुलोत्पादक, माहूली (चोर),जि. अमरावती.

नागपूर  ः बंद काळात फळे, भाजीपाला विक्रीला प्रोत्साहन दिले जात असतानाच फुलोत्पादकांना मात्र कोणी वालीच उरला नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात लाखो रुपयांची उलाढाल यामुळे ठप्प झाली असून शासनाने फुलोत्पादकांना पॅकेज जाहिर करावे, अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.

विदर्भात अमरावती, नागपूर, अकोला जिल्ह्यात फुलशेतीखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. येथील फुलोत्पादक धार्मिकस्थळे, सण, उत्सव तसेच कौटुंबिक सोहळ्यांमध्ये फुलांचा पुरवठा करतात. परंतू ‘कोरोना’मुळे धार्मिक स्थळे बंद करण्यात आले आहेत. त्यासोबतच कौटुंबिक सोहळे, लग्न व इतर कार्यक्रमही रद्द करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. यामुळे फुलोत्पादक अडचणीत आले आहेत.

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्‍यात सर्वाधिक ५०० एकरावर फुलांची लागवड करण्यात आली आहे. या भागातील शेतकऱ्यांचा हा पारंपारिक व्यवसाय आहे. येथील दररोज दिड ते दोन हजार किलो फुले बाजारात येतात. १०० शेतकरी, ५०० मजूरांचा उदरनिर्वाह यावर चालतो. हा सारा व्यवसाय ठप्प झाला आहे. फुलझाडे काढून टाकल्यास उत्पादनासाठी पुन्हा तीन ते चार महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे फुलोत्पादक चिंतेत असल्याचे उमेश फुलारी यांनी सांगितले. गॅलर्डिया, गुलाब, झेंडू, बिजली या फुलांचे उत्पादन या भागात होते. नागपूर शहरालगतच्या गावांमध्ये एक ते दहा एकरांपर्यंत फुलांची लागवड करणारे शेतकरी आहेत.

मी चार एकरांवर फुलांची लागवड केली आहे. शिर्डी गुलाब ३० ते ५० रुपये किलोने विकला जात होता. गुढीपाडव्यापासून दरात तेजी येत १०० रुपयांवर हे दर पोचतात. दर कमी असताना तीन हजार रुपयांचे उत्पन्न रोज होत होते. आता सारे काही ठप्प झाले आहे. १० मजूरांचे कुटूंब यावर अवलंबून होते. त्यांचाही रोजगार थांबला आहे. फुलशेतीला जोड म्हणून रोपवाटिका व्यवसायात उतरण्याचा निर्णय यावर्षी घेतला. परंतू ‘कोरोना’मुळे हा व्यवसायाच्या मुहूर्तालाच बंदीचे ग्रहण लागले असल्याचे संगम (ता. हिंगणा) येथील  नारायण सातपुते यांनी सांगितले.

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...