Farmer Agricultural News fodder crops plantation status Pune Maharashtra | Agrowon

पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर चारा पिकांची लागवड

टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा पिकांच्या लागवड क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत एक लाख ३८ हजार ५७८ हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा पिकांच्या लागवड क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत एक लाख ३८ हजार ५७८ हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

दरवर्षी खरिपात चारा पिकांची लागवड कमी होते. त्यामुळे रब्बीत काही प्रमाणात चारा टंचाई भासत असल्याने शेतकरी पर्याय म्हणून उसाच्या वाड्याचा वापर करतात. पुणे विभागात एक लाख हेक्टरच्या जवळपास मका, कडवळ, लुसर्नग्रास, नेपिअर ग्रास, बाजरी अशा विविध चारा पिकांची लागवड केली जाते. काही वेळेस यापेक्षाही कमी प्रमाणात चारा पिकांची लागवड होते. साधारणपणे लागवडीनंतर  दोन ते तीन महिन्यात चाऱ्याचे उत्पादन सुरु होते. काही शेतकरी उत्पादन झालेला चारा वाळवून तो टप्याटप्याने वापरतात. त्यामुळे उन्हाळ्यात चारा टंचाई कमी होण्यास मदत होते.

गेल्या वर्षी विभागात सुमारे एक लाख १७ हजार ८५० हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० हजार ७२८ हेक्टरने लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.  यंदा खरिपात नगर जिल्ह्यात ६७ हजार ३७० हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली आहे. नगर, पारनेर, कर्जत, नेवासा, राहुरी, संगमनेर, कोपरगाव, राहाता या तालुक्यांत बऱ्यापैकी चारा पिकांचे क्षेत्र आहे. जामखेड, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर, अकोले तालुक्यात कमी क्षेत्रावर चारा पिकांची लागवड झाली आहे.

पुणे जिल्ह्यात ४१ हजार ६८६ हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली आहे. यामध्ये हवेली, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात चारा पिकांची लागवड झाली आहे. मुळशी, भोर, मावळ, वेल्हे तालुक्यात अल्प क्षेत्रावर चारा पिकांची लागवड झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात अत्यंत कमी क्षेत्रावर चारा पिकांची लागवड झाली आहे. जिल्ह्यात २९ हजार ५२२ हेक्टरवर चारा पिके आहेत. दक्षिण सोलापूर,अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस तालुक्यात बऱ्यापैकी चारा पिकांची लागवड झाली आहे. उत्तर सोलापूर, बार्शी, मंगळवेढा या तालुक्यांत अत्यंत कमी क्षेत्रावर चारा पिके आहेत.
 

चारा पिकांची लागवड स्थिती (हेक्टर)
पीक    लागवड क्षेत्र
मका    ५३,५७३
कडवळ ३३,०२८
बाजरी २४४
लुसर्नग्रास ११,३१३
नेपिअर ३४२८
इतर चारा पिके ३४,७९५

 


इतर ताज्या घडामोडी
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...
नागपुरात पीक नुकसानीचे  पंचनामे सुरू...नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...