जत तालुक्‍याच्या पूर्व भागात चारा टंचाई

सांगली ः पावसाने दिलेली दडी, वाया गेलेला खरीप व रब्बी हंगाम, दुष्काळी स्थिती यामुळे जत पूर्व भागात चारा टंचाई निर्माण झाली आहे. दरीबडची, संख, माडग्याळ, जाडरबोबलाद, सोन्याळ,जालिहाळ खुर्द परिसरात साठवून ठेवलेला चारा संपत आला आहे.त्यामुळे पशुपालकांसमोर जनावरे जगवायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जत तालुक्यात पशुपालकांकडील चारा साठा संपत आला आहे
जत तालुक्यात पशुपालकांकडील चारा साठा संपत आला आहे

सांगली  ः पावसाने दिलेली दडी, वाया गेलेला खरीप व रब्बी हंगाम, दुष्काळी स्थिती यामुळे जत पूर्व भागात चारा टंचाई निर्माण झाली आहे. दरीबडची, संख, माडग्याळ, जाडरबोबलाद, सोन्याळ,जालिहाळ खुर्द परिसरात साठवून ठेवलेला चारा संपत आला आहे.त्यामुळे पशुपालकांसमोर जनावरे जगवायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुष्काळग्रस्त जत तालुक्‍यात शेतीबरोबरच जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाचा व्यवसाय केला जातो. खिलार जनावरांसाठी व माडग्याळ मेंढीसाठी हा तालुका प्रसिद्ध आहे. तालुक्‍यात सुमारे ६ लाख १० हजार ६०५ जनावरे आहेत.

पूर्व भागातील दरीबडची, संख, माडग्याळ, सोन्याळ,उटगी,लकडेवाडी,जाडरबोबलद, सिद्धनाथ, तिल्याळ, आसंगी (जत),जालिहाळ खुर्द, लमाणतांडा (दरीबडची), गोंधळेवाडी, अंकलगी,गुड्डापूर या भागात गतवर्षी पाऊस अत्यल्प झाला आहे. खरीप, रब्बी हंगाम वाया गेला आहे. शेतक-यांनी पुढे पाऊस पडेल या आशेवर खरीप व रब्बी हंगामातील पेरणी केली होती. परंतु पावसाअभावी पिके वाळून गेली आहेत. जनावरांना वैरण आली नाही. थोडी आलेली वैरण शेतकऱ्यांनी रचून ठेवली आहे.

उन्हाळ्यात विहीरी, कूपनलिकांना पाणी नसल्याने चारा पिके घेता आली नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षाचा व साठवून ठेवलेला चारा संपला आहे. चा-याअभावी शेतक-यांना जनावरे जगविणे कठीण झाले आहे. तसेच सहा गावांना टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. द्राक्ष व डाळिंब बागेला टॅंकरने पाणी दिले जात आहे. या भागात जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याअभावी शेतात ओला चारा नसल्याने दुभती जनावरे संकटात सापडली आहेत. चाऱ्याअभावी दुधाच्या प्रमाणात घट झाली आहे. दूध संकलन कमी झाल्याने या भागातील संकलन केंद्रे अडचणीत आली आहेत.

कर्नाटकातील वैरण बंद   कर्नाटकातील तिकोटा,बिजरगी,कनमडी, बाबानगर परिसरामध्ये डोणची जमीन आहे. येथे माफक दरामध्ये वैरण मिळत असल्यामुळे पशुपालक येथून वैरणीची खरेदी करतात. सीमेवरील सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्नाटकातून येणारी वैरण बंद झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com