Farmer Agricultural News Forced to purchase of unnecessary fertilizers Pune Maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी करण्याची कृषी केंद्र चालकांकडून सक्ती 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 जुलै 2020

मी मे महिन्यात खते खरेदी केली असल्याने वैयक्तिक मला अडचण आली नाही. मात्र, सध्या गावातील बहुतांशी शेतकऱ्यांना खत टंचाईचा सामना करावा लागत आहे. हव्या असलेल्या कंपनीची खते न देता दुसऱ्या कंपन्यांची खते खरेदी करण्याचा आग्रह काही विक्रेत्यांकडून केला जातो. याशिवाय खते विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना पावत्या दिल्या जात नाहीत. 
- नितीन गायकवाड, चांदखेड, ता. मावळ, जि. पुणे. 

पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची आवश्यकता असते. बहुतांशी शेतकरी कृषी सेवा केंद्र चालकांकडून खते खरेदी करीत आहेत. मात्र, पुणे जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी शेतकऱ्यांना निविष्ठा विक्रेत्यांकडून नको असलेली खते खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. काही ठिकाणी अजूनही पेरणी सुरू आहे. पेरणीसाठी युरियाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. मात्र, जिल्ह्यातील अनेक भागात युरियाची टंचाई भासत आहे. त्यातच काही ठिकाणी विक्रेते युरियाची जादा दराने विक्री करत असल्याचे चित्र आहे. तसेच विक्रेते व कंपन्यांकडून युरियासोबत डीएपी किवा अन्य खते खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. गरज नसताना इतर खते माथी मारली जात असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र दोन लाख ३० हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी दोन लाखांहून अधिक क्षेत्रावर पेरणीचा अंदाज आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात जवळपास एक लाख ७७ हजार ५१३ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. पेरणीच्या वेळी आणि पिके वाढीच्या अवस्थेत असताना प्रामुख्याने युरियाची मोठ्या प्रमाणात गरज असते. 

खोपी (ता.भोर) येथील प्रगतीशील शेतकरी दादा पवार म्हणाले, की आमच्या भागात मोठ्या प्रमाणात भात लागवड होते. सध्या भात लागवडी सुरू झाल्या आहेत. त्यासाठी डीएपी व युरिया आवश्यक आहेत. अनेक शेतकरी कृषी सेवा केंद्रांकडे डीएपी व युरियाची मागणी करतात. मात्र, बहुतांशी दुकानदारांकडे खते उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच काही विक्रेते शेतकऱ्यांना विक्रीच्या पावत्याही देत नसल्याचे दिसून येत आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...