Farmer Agricultural News fresh vegetables send to mumbai Maharashtra | Agrowon

शेतातील भाजीपाला पॅकेज थेट मुंबईकरांच्या दारात

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

नाशिक: कोरोनामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करण्यात तर दुसरीकडे ग्राहकांना तो खरेदी करण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रीसह मागणी व पुरवठा साखळी अडचणीत सापडली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने ‘शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला पॅकेज थेट मुंबईकरांच्या दारात’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने दोन वाहनांतून आठ प्रकारच्या भाजीपाल्याची पॅकिंग करून माल पाठविण्यात आला आहे.

नाशिक: कोरोनामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करण्यात तर दुसरीकडे ग्राहकांना तो खरेदी करण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रीसह मागणी व पुरवठा साखळी अडचणीत सापडली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने ‘शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला पॅकेज थेट मुंबईकरांच्या दारात’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने दोन वाहनांतून आठ प्रकारच्या भाजीपाल्याची पॅकिंग करून माल पाठविण्यात आला आहे.
 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर वाशी मार्केट व्यापाऱ्यांनी बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे भाजीपाला पुरवठा होण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून थेट घरात भाजीपाला पुरविण्यासाठी कार्यकर्त्यांनी हे काम हाती घेतले आहे. तालुक्यातील शेतकरी विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. ज्या शेतकऱ्यांचा माल काढणीसाठी तयार आहे. त्यांना संपर्क करून शेतीमालाची रास्त दरात खरेदी करण्यात येत आहे. यामध्ये हिरवी मिरची, ढोबळी मिरची, कांदे, बटाटे, टोमॅटो, कोबी, भोपळा व शेवगा हा भाजीपाला पॅकेजमध्ये समाविष्ट आहे.

हा भाजीपाला संकलित करून बाजार समिती आवारात हाताळणी व प्रतवारी करून विशिष्ट पिशवीमध्ये तो भरला जात आहे. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून देवा वाघ हे काम पाहत आहेत.

भाजीपाल्याच्या गुणवत्तेलाही प्राधान्य दिले जात असून कृषिमंत्री श्री.भुसे यांनी विशेष लक्ष घातले आहे. स्वतः भेट देऊन कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. हा सर्व शेतमाल पॅकिंग करून मुंबईकडे पाठविण्यात आला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे याकामी सहकार्य लाभत असून अगदी रास्त दरात हे पॅकेज ग्राहकांच्या दारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ही आहे उपक्रमाची वैशिष्ट्ये:

  • थेट ताज्या शेतमालाचा ग्राहकांना पुरवठा
  • पॅकेजमध्ये ८ प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्यांचा समावेश
  • पॅकेजमध्ये ६.५ किलो वजनाचा भाजीपाला. किंमत १०० रुपये
  • पॅकिंग करून गुणवत्ता व प्रतवरीला प्राधान्य
  • पॅकेजमध्ये आठवडाभर पुरेसा भाजीपाला

इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...