Farmer Agricultural News fuel will available for farming vehicles Pune Maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात शेती यंत्रसामग्री, वाहनांसाठी इंधन उपलब्ध होणार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतीशी निगडीत कामे करण्यासाठी आवश्‍यक वाहने व यंत्रसामग्रीसाठी (ट्रॅक्टर व पंप) इंधन उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र शेतीच्या नावाखाली विनाकारण फिरता येणार नाही, तसेच त्यासाठी इंधन दिले जाणार नाही.
- डॉ. जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी

पुणे  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. यातून शेती विषयक कामांना सूट देण्यात आली आहे. शेतीसाठी लागणारी वाहने, यंत्रसामग्री, स्वयंचलित अवजारांसाठी इंधन उपलब्ध करून देण्याची मागणी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली होती. त्यानुसार शेतीकामांसाठी इंधन उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पेट्रोल पंप चालकांना देण्यात आल्या आहेत.

शेतीविषयक कामे करण्यासाठी विशेषतः शेतावर जाण्यासाठी, तसेच शेतीकामे करणारे ट्रॅक्टर व इतर वाहनांसाठी पेट्रोल व डिझेलची आवश्‍यकता आहे. पंपावर शेतकऱ्यांना इंधन मिळण्यास अडचणी येत आहेत. शेतीकामांसाठी लागणारी यंत्रसामग्री चालविण्यासाठी, शेतकरी आणि शेतमजूरांना शेतावर जाण्यासाठी वाहनांना लागणारे इंधन मिळावे, अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली यांच्याकडे केली होती.

टाळेबंदीच्या काळात शेतीशी निगडीत कामे सुरळीत पार पाडावीत, कृषी उत्पादनांची खरेदी विषयक कामे, मंडई, बाजार समित्यांची कृषी विषयक कामे, पीक पेरणी संबंधाने यंत्रांच्या दुरुस्तीसाठी आवश्‍यक कामे, दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार शेतीच्या कामांसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरसम वाहने, उपकरणे व इतर यंत्रांसाठी इंधन उपलब्ध करून देण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे दिल्या आहेत.

 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...