Farmer Agricultural News Funds should be provide for farm pond drip irrigation Solapur Maharashtra | Agrowon

शेततळे, ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी निधी द्यावा : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यातील शेततळे, अस्तरीकरण कागद, ठिबक सिंचन यांचे थकित अनुदान देण्यासाठी निधी मिळावा. तसेच जिल्ह्यातील थकीत १३ हजार २६१ कृषीपंपाच्या जोडण्यांबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खरीप नियोजन बैठकीत केली.

सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यातील शेततळे, अस्तरीकरण कागद, ठिबक सिंचन यांचे थकित अनुदान देण्यासाठी निधी मिळावा. तसेच जिल्ह्यातील थकीत १३ हजार २६१ कृषीपंपाच्या जोडण्यांबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खरीप नियोजन बैठकीत केली.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खरीप हंगाम पुर्व आढावा बैठकीत त्यांनी ही मागणी केली. या बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी कार्यालयातून व्ही.सी.व्दारे सहभागी झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, कृषी सभापती अनिल मोटे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, विशेष अधिकारी पी. शिवशंकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले, की जिल्ह्यातून मागेल त्याला शेततळे योजनेला मागणी आहे. त्याचबरोबर शेततळ्यासाठी लागणारा कागद, ठिबक संचाचे अनुदान थकीत आहे. हे अनुदान देण्यासाठी निधी द्यावा. जिल्ह्यात १३ हजार २६१ कृषीपंपांच्या वीज जोडण्या बाकी आहेत. त्या लवकरात लवकर जोडून मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना बांधावर खते आणि बियाणे देण्याच्या योजनेनुसार ७४७१ शेतकऱ्यांना आतापर्यंत बांधावर २२ हजार १७० क्विंटल खताचे आणि १७१ क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
‘अटल भूजल’मध्ये जळगावातील चार तालुके जळगाव : तेरा जिल्ह्यांत एक हजार ३३९...
खासदार गोडसेंकडून कृषी योजनांच्या...नाशिक : शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने...
करमाळ्यातील खडकीत बिबट्यासदृष्य...करमाळा, जि. सोलापूर : खडकी (ता. करमाळा)...
खरेदी केंद्रात व्यापाऱ्यांचा कापूस घेऊ...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यात कापसाचे उत्पादन...
चोपडा तालुक्यात `हतनूर`चे पहिले आवर्तन...गणपूर, जि. जळगाव : हतनूर धरणातून...
नांदेड जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर हरभरा नांदेड : ‘‘यंदाचा समाधानकारक पाऊस आणि...
हिंगोली जिल्ह्यात मर रोगामुळे तूर लागली...हिंगोली : जिल्ह्यातील अनेक भागातील फुलोरा, शेंगा...
पीकविम्यासाठी कृषी विभागाकडे संपर्क करा...नांदेड  : ‘‘ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने...
बटाटा लागवड ठरली फायदेशीरमहाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्‍यातील कळंब, लौकी,...
साताऱ्यात ‘स्वाभिमानी’चे आंदोलनसातारा  : कृषी कायद्याविरोधात पंजाब व...
अकोल्यात रब्बीसाठी २९ कोटींचे कर्जवाटपअकोला : यंदाच्या रब्बी हंगामात लागवड ६५...
रब्बीच्या हंगामात विजेचा अडसररिसोड, जि. वाशीम  : सिंचन सुविधा निर्माण...
विमा कंपन्यांनी सरसकट भरपाई द्यावी - ...यवतमाळ :  जिल्ह्यातील ४ लाख ६७ हजार २१...
जागेअभावी संग्रामपुरात पाच दिवसांपासून...संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाकडे मका...
दोन दिवसांत निर्णय न झाल्यास केंद्र...कोल्हापूर : दोन दिवसांत दिल्लीतील...
गोंदियात ८५ हजार क्विंटल धान खरेदीगोंदिया : जिल्ह्यात हमीभावाने खरेदीसाठी सुरू...
अन्न उद्योग सक्षमीकरणात बारामती ‘...पुणे : सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचे...
‘ग्रामविकास’कडून वर्षभरात लोकाभिमुख...कोल्हापूर : गेल्या एक वर्षांच्या कालावधीत...
शेतकऱ्यांना अडविणारे राजकारणातून संपणारवर्धा : देशात शेतकऱ्यांना अडविणे आणि शेतकरीविरोधी...