Farmer Agricultural News good response for milk rate issue agitation Nagpur Maharashtra | Agrowon

दूध दरप्रश्नी आंदोलनाला विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

नागपूर : दूध दरप्रश्नी भाजपच्या वतीने शनिवारी (ता.१) करण्यात आलेल्या आंदोलनाला विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नागपूर : दूध दरप्रश्नी भाजपच्या वतीने शनिवारी (ता.१) करण्यात आलेल्या आंदोलनाला विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अमरावती येथे ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. हा अपवाद वगळता विदर्भातील अकरा जिल्ह्यांत आंदोलन शांततेत पार पडले.

भाजप किसान मोर्चा, रयत क्रांती संघटनेसह  महायुतीतील घटक पक्षांच्यावतीने दुधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान द्यावे, दुधाला ३० रुपये दर द्यावा, तसेच दूध भुकटीला ५० रुपये किलोप्रमाणे निर्यातीसाठी अनुदान देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती.

पूर्व विदर्भातील दुर्गम गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये देखील निःशुल्क दूध वितरण करीत आंदोलन करण्यात आले. यवतमाळ येथे माजी राज्यमंत्री मदन येरावार,  प्रा. अशोक उईके यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. नागपूर येथे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांनी शहरातील काही दूध संकलन केंद्रावर जात तेथील दूध गरजूंना निःशुल्क वाटप केले. वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वर्धा येथे खासदार रामदास तडस यांनी दूध वाहतूक करणारी वाहने थांबवत या वाहनांमधील दुधाचे गरजूंना निःशुल्क वितरण केले. 

अमरावती जिल्ह्यात भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात मुंबई - नागपूर महामार्गावरील टोल नाक्यावर पहाटेच्यावेळी दूध घेऊन जाणारी वाहने रोखण्यात आली. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी दूध उत्पादकांना शेतकऱ्यांना या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप डॉ. बोंडे यांनी यावेळी केला.

प्रतिक्रिया

शांततामय मार्गाने करण्यात आलेल्या या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास दुसऱ्या टप्प्यात तीव्र आंदोलन केले जाईल. सामान्यांना या आंदोलनाची झळ पोचू नये, याकरिता मंत्र्यांच्या घरचा दूध पुरवठा आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात रोखण्यात येईल असे प्रस्तावित आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाबाबत सर्व घटकांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार आहे.
- डॉ. अनिल बोंडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा.
 
असे झाले आंदोलन

  • अनेक ठिकाणी गरजूंना निःशुल्क दूध वाटप.
  • अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांना अटक.
  • सेलू येथे रास्ता रोको आंदोलन. 

 


इतर बातम्या
सिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन...
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
मोर मध्यम प्रकल्पाच्या कालवा...हिंगोणा, जि. जळगाव ः सातपुडा पर्वतातील मोर...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
खेडे स्वयंपूर्ण, तर राज्य, देश...नाशिक : ‘‘कोविड- १९ च्या या परिस्थितीत...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यातील १७८...सोलापूर : ‘‘सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा...
प्रविण कसपटे ठरले सर्वाधिक बिझनेस...बार्शी : येथील युवा उद्योजक प्रविण कसपटे यांनी...