Farmer Agricultural News government ignore water issue of irrigation scheme Sangli Maharashtra | Agrowon

विस्तारीत ‘म्हैसाळ’ला तत्त्वतः मंजुरी मिळूनही सरकारचे दुर्लक्ष

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

म्हैसाळ योजनेचे पाणी देऊ, असे आश्वासन नेहमीच दिले जाते. वंचित गावांना पाणी देण्यासाठी भाजप सरकारने निधीला तत्त्वतः मंजुरी दिली आहे. मग पुढील कार्यवाही कधी पूर्ण होऊन पाणी देणार हा प्रश्न कायम आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेऊन वंचित गावांना पाणी द्यावे.
- विठ्ठल चव्हाण, शेतकरी, उमदी, ता. जत.

सांगली  ः जत तालुक्‍यातील ६४ गावांना म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहाशे कोटींच्या निधीला तत्वतः मंजुरी दिली होती. या पार्श्र्वभूमीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्राधान्याने जत तालुक्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. परंतु तसे न करता मिरज तालुक्यातील वंचित गावांना पाणी देण्यासाठी तातडीने मंजुरी देण्यात आली. मग आम्हाला पाणी देण्यासाठी चालढकल का केली जात आहे, असा सवाल जतमधील शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावांना सिंचन योजनेचे पाणी देणार अशी घोषणा गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. अद्यापही या भागाला पाणी मिळालेले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारासाठी संख येथे आले होते. त्या वेळी त्यांनी या वंचित गावांना पाणी देण्यासाठी ६००कोटींच्या निधीला तत्त्वतः मंजुरी दिल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळणार अशी आशा होती.   गेल्या काही वर्षात योजना पूर्ण करण्यासाठी गती आली. जत तालुक्यातील या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी ६४ गावांचा पाणी प्रश्न निकाली निघालेला नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. जिल्ह्यातील जयंत पाटील जलसंपदा विभागाचा कारभार पाहत आहेत. त्यांच्याकडून जतला मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 
 


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...