Farmer Agricultural News government will bring companies sellers under the ambit of compensation Nagpur Maharashtra | Agrowon

कंपन्यांसोबतच विक्रेत्यांनाही आणणार भरपाईच्या कक्षेत : कृषिमंत्री दादा भुसे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

एखाद्या शेतकऱ्याने दहा बॅग सोयाबीन पेरले आणि त्यातील एखाद्या बॅगमधील बियाण्याची उगवण झाली नसल्यास त्यास इतर काही तांत्रिक बाबी असू शकतात. त्यामुळे सरसकट बियाणे निकृष्ट किंवा बोगस असल्याचे म्हणणे सयुक्तिक ठरणार नाही.
- दादा भुसे, कृषिमंत्री.

नागपूर  ः राज्यात सोयाबीन बियाणे उगवणविषयक वाढत्या तक्रारींची पडताळणी केली जाईल. तसेच याबाबत खासगी कंपन्यांसोबतच विक्रेत्यांवरही जबाबदारी निश्चि‍त करून भरपाईची तरतूद करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

राज्यात यावर्षी सोयाबीन बियाण्याच्या उगवणविषयक तक्रारींनी उच्चांक गाठला आहे. विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये हा आकडा साडेचार ते पाच हजारांवर पोचला आहे. शासनाने एका आदेशान्वये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाला उगवण न झालेल्या शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्याचे आदेश दिले आहेत. महाबीजसोबतच खासगी कंपन्यांच्या देखील बियाणे विषयक तक्रारी आहेत. त्यांच्यावर कारवाईबाबत मात्र संदिग्धता आहे. रविवारी (ता.२८) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना बियाणे कंपन्यांवर देखील कडक कारवाईचा इशारा दिला होता. परंतु बियाणे कायद्यातील तरतुदींबाहेर जात कोणती कारवाई शासनाकडून केली जाईल, याविषयी उत्सुकता वाढली आहे. 

दरम्यान, कृषिमंत्री भुसे यांनी बियाणे उगवण विषयक तक्रार असलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रचलित पद्धतीत अनेक बदल करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले. त्यामध्ये तक्रारींची वाढती संख्या पाहता उपविभागीय अधिकाऱ्यांऐवजी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार निवारण समितीची सूत्रे देणे, विद्यापीठांचे तज्ज्ञ व कृषी विभागामार्फत बियाणे उगवण विषयक नेमक्‍या कारणांचा शोध घेणे अशा बाबींचा समावेश आहे.

शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका असल्याने खासगी कंपन्यांकडून कशाप्रकारे भरपाई मिळवून देता येईल, याबाबत विचार सुरू असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले. या प्रक्रियेत विक्रेत्याला देखील जबाबदार धरण्याचा प्रस्ताव असून कंपनी आणि विक्रेता मिळून भरपाई किंवा बियाणे बदल करून देण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...