farmer agricultural news governor speak on several issues in assembly mumbai maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करणार ः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 2 डिसेंबर 2019

मुंबई  ः शेतकऱ्यांवर आलेल्या आपत्तीची जाणीव शासनाला असून, राज्य शासन शेतकऱ्यांना पीक कर्जमुक्‍त व चिंतामुक्त करणार असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी केले. 

विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहापुढे रविवारी (ता. १) राज्यपाल कोशियारी यांचे अभिभाषण झाले. त्या वेळी ते बोलत होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.  
 

राज्यपालांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

मुंबई  ः शेतकऱ्यांवर आलेल्या आपत्तीची जाणीव शासनाला असून, राज्य शासन शेतकऱ्यांना पीक कर्जमुक्‍त व चिंतामुक्त करणार असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी केले. 

विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहापुढे रविवारी (ता. १) राज्यपाल कोशियारी यांचे अभिभाषण झाले. त्या वेळी ते बोलत होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.  
 

राज्यपालांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

  •  नुकत्याच पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे मोठे नुकसान झाले आणि त्याच वेळी राज्यातील बहुतांश भागाला दुष्काळाला सामोरे जावे लागले. ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात मॉन्सूनोत्तर पाऊस झाल्यामुळे ३४ जिल्ह्यांतील ३४९ तालुक्यांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यासाठी शासन वचनबद्ध आहे.  
  • शेतीमालाच्या दरातील चढ-उतारांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या नुकसानीचे निवारण करण्यासाठी शेतीमालाला योग्य भाव मिळण्याच्या दृष्टीने शासन उपाययोजना हाती घेणार आहे.  
  • राज्यातील आणि विशेषत: मराठवाडा व विदर्भातील दुष्काळग्रस्त क्षेत्रांमध्ये शाश्वत पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येईल.  
  • रोजगार निर्माण करण्यासाठी राज्य शासनातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
  • खासगी क्षेत्रांमधील रोजगारांमध्ये भूमिपुत्रांसाठी ८० टक्के आरक्षण ठेवण्यासाठी कायदा करणार आहोत.  
  • महिलांच्या सुरक्षेस शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल आणि यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवल्या जातील.  
  • शासन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना महाविद्यालयीन व उच्च शिक्षण मोफत देण्यासाठी प्रयत्न करील.  
  • अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न असेल.  
  • राज्यात महिलांद्वारे चालवण्यात येणारे आठ लाख स्वयंसाह्यता (बचत) गट असून शासन, महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच कौशल्य विकास कार्यक्रमांद्वारे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असलेले कौशल्य देऊन स्वयंसाह्यता (बचत) गटांचे बळकटीकरण करण्याचा प्रयत्न करेल.    
  • प्लॅस्टिक, थर्माकोल व प्लॅस्टिक पिशव्यांचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम गंभीर आहेत. हे दुष्परिणाम कमी करण्यासाठी शासनाने, एकदाच वापरले जाणाऱ्या प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वस्तू, प्लॅस्टिक व न विणलेल्या पिशव्यांवर राज्यभरात बंदी घातली आहे. या बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल.

इतर ताज्या घडामोडी
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...
दूधदरवाढीसाठी ‘स्वाभिमानी’चे परभणीत...परभणी ः मराठवाड्यात शासकीय दूध योजनेअंतर्गंत...
सोलापुरात कांद्यासह सर्व व्यवहार ठप्पसोलापूर : केंद्र सरकारने आणलेल्या सीएए आणि एनआरसी...
चार प्रकल्पातून मराठवाड्यात पावणेतीन...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, बीड,...
‘विठ्ठल’च्या कारभाराची स्वतंत्र चौकशी...पंढरपूर, जि. सोलापूर : विठ्ठल साखर कारखान्याच्या...
परभणीत फ्लॉवर ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...
खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने...जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी...
फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही;...नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये...
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून...जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली...
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना...वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान...