पुणे बाजार समितीतील भुसार बाजार सुरु

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भुसार बाजारातील काही व्यापारी आणि घटकांना ‘कोरोना’ची लागण झाल्यानंतर पूना मर्चंटस चेंबरने काही दिवस बाजार बंद ठेवला होता. यानंतर आता सोमवारपासून (ता.२५) भुसार बाजार पुन्हा सुरु झाला असून, सुमारे २०० ट्रक अन्नधान्याची आवक झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली.
संग्रहित छायाचित्र

भुसार बाजार सुरळीत करण्याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी सुचना केल्या होत्या. त्यानुसार पणन संचालक सुनील पवार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि शहर पोलीस प्रशासनासोबत मर्चंटस चेंबरच्या झालेल्या बैठकांमधून खबरदारीच्या उपाययोजना करत बाजार सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बाजार आवारात येणाऱ्या सर्व घटकांची थर्मल तपासणी, सॅनिटायझर, मास्कचा वापर, गर्दी टाळण्यासाठी शारिरीक अंतर राखत बाजार सुरु करण्यात आल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान भुसारनंतर फळे, भाजीपाल्याचा बाजार देखील सुरु करण्याचे प्रयत्न बाजार समितीचे असून यासाठी आज (ता.२६) अडते असोसिएशनची बैठक होणार आहे. बैठकीमधील सुचनांनुसार बाजार सुरु करण्याबाबतचा निर्णय होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com