पर्यटन महामंडळाच्या वतीने जुन्नरला आजपासून द्राक्ष महोत्सव

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः जिल्ह्यातील जुन्नर येथील प्रसिद्ध द्राक्षांची चव पर्यटकांना थेट बागांमध्ये जाऊन चाखता यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने सोमवार (ता. ९) आणि (ता. १०) दरम्यान जुन्नर द्राक्ष महोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवा दरम्यान पर्यटकांना ग्रामीण खाद्य संस्कृतीचा देखील आनंद घेता येणार आहे. 

राज्य सरकारने जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुक्याचा दर्जा दिला आहे. या निमित्ताने पर्यटन विकास महामंडळाकडून विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षी जुन्नर हापूस महोत्सव तर संक्रातीला पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या द्राक्षाचा हंगाम सुरू असून, द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

महोत्सवामध्ये आर्वी आणि नारायणगाव परिसरातील द्राक्ष बागांमध्ये पर्यटकांना द्राक्षांची काढणी, पॅकिंग, हाताळणीच्या अनुभवाबरोबरच त्यांची चव देखील चाखता येणार आहे. माळशेज घाटातील पर्यटक निवासात राहण्याची संधी मिळणार आहे. यासाठी माळशेज पर्यटक निवासचे व्यवस्थापक विष्णू गाडेकर ९८२२०४३१७५, ७७६८०३६३३२, शेतकरी अभिजित रोकडे ९०९६९८१९९९, श्रीराम गाढवे  ७५८८०३१७७७ यांच्याशी या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com