Farmer Agricultural News grapes lime producers facing trouble due to corona Nagar Maharashtra | Agrowon

श्रीगोंद्यातील द्राक्ष, लिंबू उत्पादकांना मोठा फटका

टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 एप्रिल 2020

जीवापाड जपलेल्या द्राक्ष बागांचे यंदा ‘कोरोना’मुळे नुकसान झाले. लिंबू उत्पादकांनाही मोठा फटका बसला. सरकारने त्यांना मदत द्यावी.
- रमेश हिरवे, शेतकरी. 

श्रीगोंदे, जि. नगर : श्रीगोंदे तालुक्यातील द्राक्ष उत्पादक यंदा पुरते त्रस्त झाले आहेत. ‘कोरोना’च्या संकटाने ऐन काढणीला आलेला माल शेतातच ठेवण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली. बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यांना १५ रुपये किलोने द्राक्ष देण्याची वेळ आली. हीच अवस्था लिंबू उत्पादकांची झाली. पंधरा दिवस तर शेतात लिंबाचा सडा पडला होता. तालुक्यात या दोन पिक उत्पादकांना दिडशे कोटींवर फटका बसल्याची माहिती पुढे येत आहे.
 

द्राक्ष बागांना जीवापाड जपणारे तालुक्यातील अनेक शेतकरी यंदा मात्र हतबल दिसले. गेल्यावर्षी दिवाळीत संततधार पाऊस झाला. अनेकांनी त्यांच्या द्राक्ष बागांची दुसऱ्यांदा छाटणी केली. त्यासाठी एकरी चाळीस ते पन्नास हजारांचा वाढीव खर्चही केला. कोरोनामुळे श्रीगोंद्यात द्राक्षासोबतच लिंबाचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील पारगावसुद्रीक, बेलवंडी, घारगाव, घोटवी, लोणीव्यंकनाथ, चिंभळे, श्रीगोंदे, आढळगाव या गावांमध्ये प्रामुख्याने द्राक्ष घेतली जातात.  यंदा एक हजार तीनशे हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागा होत्या. द्राक्षांचा दरवर्षीचा शेतातील दर सत्तर रुपयांच्या घरात जात असला तरी येथे सरासरी चाळीस रुपये किलोचा दर मिळतो. कोरोनामुळे अनेकांना फटका बसला आणि हा दर सरासरी पंधरा रुपयांपर्यंत घसरला. १० मार्चनंतर तर दहा रुपयांपर्यंत खाली आला. येथील शेतकरी सरासरी एकरी पंधरा ते वीस टन द्राक्ष उत्पादन घेतो. त्यामुळे साधारण एकरी सहा लाखांचे उत्पन्न मिळते. यंदा मात्र अनेकांचे उत्पन्न निम्यावर आले.

हीच अवस्था लिंबू उत्पादकांची झाली. तालुक्यात साधारण सात हजार हेक्टरवर लिंबू बागा आहेत. ज्या काळात लिंबाचे दर वाढतात त्याचवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागला आणि वर्षभर दराची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची कुचंबणा झाली. लाॅकडाउनच्या काळात पंधरा दिवस तर लिंबं बागेतच राहिली. त्यापुर्वी पाच रुपये किलो दर मिळाला.

द्राक्ष आणि लिंबू उत्पादकांना ‘कोरोना’मुळे दिडशे कोटींचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले त्याचे पंचनामे झाले आहेत. मात्र ‘कोरोना’मुळे बसलेला फटका मोठा आहे, असे तालुका कृषी अधिकारी पद्मनाभम म्हस्के यांनी सांगितले. 
 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...