Farmer Agricultural News grapes production decrease Pune Maharashtra | Agrowon

आंबेगाव तालुक्यात प्रतिकूल हवामानामुळे द्राक्ष उत्पादनात घट

नवनाथ भेके
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

तीन एकर क्षेत्रावर जंबो द्राक्षांची शेती असून, मागील वर्षी उत्पादन चांगले मिळाले; पण बाजारभाव ७० ते ८० रुपये प्रतिकिलो होता. परंतु, यंदा १३० रुपये प्रतिकिलो दराने द्राक्षे दुबईला निर्यात होत आहेत. उत्पादनात घट झाली असली तरी, दर चांगला मिळत असल्याने समाधान आहे.
- प्रवीण थोरात, द्राक्ष उत्पादक, चांडोली बुद्रुक, ता. आंबेगाव

निरगुडसर, जि. पुणे ः यंदा हवामानातील बदल व परतीच्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनात प्रतिएकर सरासरी तीन ते चार टनांनी घट झाली आहे. उत्पादन खर्च वाढला आहे. परंतु, यंदा दर्जेदार निर्यातक्षम जंबो द्राक्षांना प्रतिकिलो १३० रुपये दर मिळत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांच्या तुलनेत सध्या दर चांगला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नाशिक, सांगलीसह पुणे जिल्ह्यातील जुन्नर, इंदापूर, बारामती तसेच आंबेगाव तालुक्यातील द्राक्षबागांना परतीच्या पावसाचा फटका बसून मोठे नुकसान झाले. बागा उद्ध्वस्त झाल्यामुळे द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. ज्या ठिकाणी पावसाच्या तडाख्यातून द्राक्ष बागा वाचल्या त्या ठिकाणीही उत्पादनात कमालीची घट झाली आहे. प्रतिएकर १० ते १२ टन मिळणारे उत्पादन ७ ते ८ टनांवर आले आहे. एकरी ३ ते ४ टनांनी उत्पादनात घट झाली आहे. परंतु, चांगला दर मिळत असल्याने उत्पादनातील घटीची तूट भरून निघत आहे.

आंबेगाव तालुक्यात कळंब, चांडोली, लौकी, महाळुंगे-पडवळ, नागापूर परिसरात द्राक्षशेती आहे. हवामानातील बदल, अवेळी पाऊस, धुक्याचा फटक्यामुळे सध्या द्राक्षांचा आकार कमी असून, क्रॅकिंगचे प्रमाण अधिक आहे. नागापूर (ता. आंबेगाव) येथील द्राक्ष बागायदार व बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या १३ एकर क्षेत्रावरील जंबो व रेड ग्लोब द्राक्षांची तोडणी सध्या सुरू आहे. त्यांना प्रतिएकरी ९ ते १० टन उत्पादन मिळते. प्रतवारीनुसार जंबो द्राक्षांना प्रतिकिलो ८० ते १३० रुपये दर मिळत आहे. हाच दर मागील काही वर्षांत ७० ते ८० रुपये प्रतिकिलो होता, असे द्राक्ष बागायदार घनश्याम निकम यांनी सांगितले. 

देवदत्त निकम म्हणाले की, हवामानातील बदल, अवेळी पावसामुळे यंदा एकरी द्राक्ष उत्पादनात मोठी घट झाली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. परंतु, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दर चांगला मिळत आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरतीअकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी...नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे....
मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा व्हावा,...
आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील...मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे...
कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला...कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे...
मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या...नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा...
मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार...चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार...
खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट...जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे....
भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने...नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य...
जळगाव जिल्ह्यातील बॅंका पीक कर्ज...जळगाव : जिल्ह्यात अपवाद वगळता बॅंकांनी नव्याने...
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
शब-ए-बारात, डॉ. आंबेडकर जयंतीला घरुनच...मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला...
खासगी डेअरीची संकलन यंत्रणा तोकडी;...नांदेड ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
नाशिक बाजार समितीमध्ये केवळ लिलावाला...नाशिक : ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या...
पुणे, मुंबईत भाजीपाल्याची घरपोच सुविधा पुणे ः शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला पुरवठा...
पुसदमध्ये शेतकरी कंपन्यांतर्फे...यवतमाळ : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्‍वभूमीवर पुसद येथे...
लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक...चापोली, जि. लातूर : ‘कोरोना’चा फैलाव...
कोरोना’च्या संकटामुळे माळेगावचे गाळप...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...