चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर 

सांगली : जिल्ह्यात बुधवार (ता. ८) दुपारपासून पावसाची रिमझिम सुरु झाली आहे. शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
चांदोली धरण परिसरात जोरदार पाऊस सुरु असून वारणा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. सांगली शहरासह मिरज परिसरात थांबून थांबून मोठा पाऊस झाला. जिल्ह्यातील सांगली परिसरासह शिराळा तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चांदोली धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. 

गेल्या चोवीस तासांत धरणात पाऊण टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. संततधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातून ८१५ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. धरणातून पाणी सोडल्याने वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. हा पाऊस पोषक ठरत आहे. चांदोली धरण क्षेत्रात आज अखेर ६८२ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com