Farmer Agricultural News heavy rain in kokan Marathwada Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 जुलै 2020

पुणे  : राज्यात मॉन्सूनच्या पावसाने जोर धरला आहे आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार सरी पडल्या; तर विदर्भात मात्र हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली.

पुणे  : राज्यात मॉन्सूनच्या पावसाने जोर धरला आहे आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार सरी पडल्या; तर विदर्भात मात्र हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. नाशिक, सांगली, पुणे, जालना, बीड, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. या पावसाने पाण्याअभावी कोमेजू लागलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. जोरदार पाऊस पडलेल्या भागात शेतांमध्ये पाणी साचून पिके वाहून गेली. तसेच ओढे, नाले, बंधारे तुडुंब भरले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील गहाघर येथे सर्वाधिक १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

निफाड, मालेगाव, कळवणमध्ये मुसळधार
नाशिक जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीला पावसाचे आगमन झाल्यानंतर पिकेही अंकुरली होती. मात्र, महिन्याच्या मध्यंतरीपासून पावसाने खंड दिला. त्यामुळे काही ठिकाणी पिके कोमेजून गेली. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा असताना निफाड, मालेगाव, सटाणा पावसाने दमदार हजेरी लावली. कोकणगाव परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले. पेठ, त्र्यंबकेश्‍वर, सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागात पावसाने हजरे लावली. 

सांगलीत ओढे, बंधारे तुडुंब
सांगली जिल्ह्यात पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक भागातील ओढे, बंधारे तुडुंब भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. सोमवारी रात्री पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पावसाची रिपरिप सुरु होती. तासगाव, खानापूर, कडेगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे या भागातील लहान बंधारे पाण्याने तुटूंब भरले आहेत.

पुण्यात पावसाची हजेरी
पुणे जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. गेल्या सात ते आठ दिवस पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाने जोर धरला आहे. शिरूरमधील पाबळ, कोरेगाव भागात मुसळधार पाऊस पडल्याने ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले होते. काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पश्चिम भागातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यात पावसाचा काही प्रमाणात जोर कमी आहे. इंदापूर, बारामती, दौंड भागात जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचले असून, ओढे पावसाच्या पाण्याने वाहू लागले आहे.

मराठवाड्यात आठ मंडळांत अतिवृष्टी 
मराठवाड्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. मंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंत औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला. जालना, बीड, उस्मानाबाद, हिंगोली या चार जिल्ह्यांतील आठ मंडळांत अतिवृष्टी झाली. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी जमीन पाण्याखाली गेली, तर काही ठिकाणी पिके खरडून गेली.  

मंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग) : कोकण : कुलाबा १०१, अलिबाग ८३, मुरूड ६५, श्रीवर्धन ४१, उरण ६३, चिपळूण ८१, गुहागर १४५, हर्णे ५४, राजापूर ५२, रत्नागिरी १०४, देवगड ४३, दोडामार्ग ८०, कुडाळ ११७, मालवण ७६, रामेश्‍वर ६४, सावंतवाडी ४९, वैभववाडी ४३, वेंगुर्ला ४५. मध्य महाराष्ट्र : गगनबावडा ६२, शाहूवाडी ४५, तळोदा ४२, कळवण ४०, मालेगाव ६८, नाशिक ४७, सटाना ६६, त्र्यंबकेश्वर ६४, दौंड ७२, राजगुरूनगर ४५, पुणे शहर ५५, पुरंदर ३०, मिरज ३५, विटा ११५, करमाळा ५३. मराठवाडा : औरंगाबाद ३०, अंबाजोगाई ३६, आष्टी ६०, केज ६३, हिंगोली ३८, सेनगाव ३०, आंबड १००, घनसांगवी ४२, जाफ्राबाद ३४, पातूर ४१, औसा ३०, लोहा ४०, भूम ३८, वाशी ६०. विदर्भ : नांदगाव काझी ५५, लाखंदूर ३७, बुलडाणा ३५, चिखली ३३, देऊळगाव राजा ४०, वरोरा ४२, देसाईगंज ३५, मानोरा ४४.
१०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे :  कुलाबा १०१ (मुंबई), गुहागर १४५, रत्नागिरी १०४, कुडाळ ११७ (जि. सिंधुदुर्ग), विटा ११५ (जि. सांगली), आंबड १०० (जि. जालना).

कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज
सर्वसाधारण स्थितीत असलेला मॉन्सूनचा आस, पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा यामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. आजपासून (ता. १) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यासह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही मेघगर्जना, विजांसह तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.


इतर अॅग्रो विशेष
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...