लोणावळा येथे सर्वाधिक पावसाची नोंद

पुणे जिल्ह्यातरविवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत मावळातील लोणावळा येथे सर्वाधिक ८३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे भात लागवडीला वेग येण्याची शक्यता आहे.
नानोली येथे पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीस सुरवात केली आहे
नानोली येथे पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीस सुरवात केली आहे

पुणे  ः पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. अनेक भागांत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत मावळातील लोणावळा येथे सर्वाधिक ८३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे भात लागवडीला वेग येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस होत आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने ओढे, नाले खळाळून वाहत आहे. या पावसामुळे भात रोपवाटिकांना दिलासा मिळत असला तरी भात लागवडीकरिता अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांतील बहुतांशी भागात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातही ढगाळ हवामान असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. त्यामुळे खरिपातील बाजरी, तूर, मूग, उडीद, मका या पिकांना दिलासा मिळाला असला आहे. पूर्वेकडील तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमी आहे. शनिवारी शिरूर तालुक्यातील बहुतांशी भागात हलका पाऊस झाला. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे खरिपातील पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. 

पुणे जिल्ह्यातील महसूल मंडळात झालेला पाऊस (मिलिमीटर) ः   हवेली - पुणे शहर ६.८, केशवनगर ६.८, कोथरूड ३.०, खडकवासला ३.८, थेऊर १.०, उरुळी कांचन ३.०, खेड १.५, भोसरी ८.०, चिंचवड ६.८, कळस ०.५, हडपसर ०.३, वाघोली २.५. मुळशी - पौड २६.५, घोटावडे १८.८, थेरगाव ७.०, माले १३.१, मुठे १३.१. भोर - भोर ४.०, भोळावडे १६.८, नसरापूर ८.९, किकवी ६.०, वेळू २.८, आंबावडे १७.५, संगमनेर ६.३, निगुडघर ८.९. मावळ - तळेगाव ३०.५, तळेगाव ७.५, काले ३६.०, कार्ला ३३.६, खडकाळा ३८.०, लोणावळा ८३.८, शिवणे ६.०. वेल्हा - वेल्हा २०.८, पानशेत २६.०, विंझर १९.८, अंबावणे १६.८. जुन्नर - जुन्नर ४.५, नारायणगाव २.३, वडगाव आनंद २.३, बेल्हा ०.५, राजूर १०.३, डिंगोरे १३.५, आपटाळे ७.५. खेड -  वाडा ५.५, राजगुरूनगर ६.५, कुडे ६.५, पाईट १५.०, चाकण ६.३, आळंदी ५.८, पिंपळगाव ४.०, कन्हेरसर २.५, कडूस ६.५. आंबेगाव - घोडेगाव १.०, कळंब ३.०, शिरूर - वडगाव ०.३, न्हावरा २.५, मलठण १.५, रांजणगाव ६.५, कोरेगाव २.३, शिरूर ०.३. बारामती -  पणदरे ०.५, वडगाव ०.८, लोणी ०.३. इंदापूर - इंदापूर १.५, बावडा ०.३, काटी ०.४, निमगाव ०.५, सणसर ०.३. दौंड - देऊळगाव २.८, राहू २.३, दौंड १.०. पुरंदर -  भिवंडी १.८, कुंभारवळण ०.५, परिंचे २.०.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com