Farmer Agricultural News heavy rain in Lonavla Maharashtra | Agrowon

लोणावळा येथे सर्वाधिक पावसाची नोंद

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 जुलै 2020

पुणे जिल्ह्यात रविवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत मावळातील लोणावळा येथे सर्वाधिक ८३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे भात लागवडीला वेग येण्याची शक्यता आहे.

पुणे  ः पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. अनेक भागांत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत मावळातील लोणावळा येथे सर्वाधिक ८३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे भात लागवडीला वेग येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस होत आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने ओढे, नाले खळाळून वाहत आहे. या पावसामुळे भात रोपवाटिकांना दिलासा मिळत असला तरी भात लागवडीकरिता अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांतील बहुतांशी भागात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातही ढगाळ हवामान असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. त्यामुळे खरिपातील बाजरी, तूर, मूग, उडीद, मका या पिकांना दिलासा मिळाला असला आहे. पूर्वेकडील तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमी आहे. शनिवारी शिरूर तालुक्यातील बहुतांशी भागात हलका पाऊस झाला. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे खरिपातील पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. 

पुणे जिल्ह्यातील महसूल मंडळात झालेला पाऊस (मिलिमीटर) ः  हवेली - पुणे शहर ६.८, केशवनगर ६.८, कोथरूड ३.०, खडकवासला ३.८, थेऊर १.०, उरुळी कांचन ३.०, खेड १.५, भोसरी ८.०, चिंचवड ६.८, कळस ०.५, हडपसर ०.३, वाघोली २.५.मुळशी - पौड २६.५, घोटावडे १८.८, थेरगाव ७.०, माले १३.१, मुठे १३.१. भोर - भोर ४.०, भोळावडे १६.८, नसरापूर ८.९, किकवी ६.०, वेळू २.८, आंबावडे १७.५, संगमनेर ६.३, निगुडघर ८.९. मावळ - तळेगाव ३०.५, तळेगाव ७.५, काले ३६.०, कार्ला ३३.६, खडकाळा ३८.०, लोणावळा ८३.८, शिवणे ६.०. वेल्हा - वेल्हा २०.८, पानशेत २६.०, विंझर १९.८, अंबावणे १६.८. जुन्नर - जुन्नर ४.५, नारायणगाव २.३, वडगाव आनंद २.३, बेल्हा ०.५, राजूर १०.३, डिंगोरे १३.५, आपटाळे ७.५. खेड -  वाडा ५.५, राजगुरूनगर ६.५, कुडे ६.५, पाईट १५.०, चाकण ६.३, आळंदी ५.८, पिंपळगाव ४.०, कन्हेरसर २.५, कडूस ६.५. आंबेगाव - घोडेगाव १.०, कळंब ३.०, शिरूर - वडगाव ०.३, न्हावरा २.५, मलठण १.५, रांजणगाव ६.५, कोरेगाव २.३, शिरूर ०.३. बारामती -  पणदरे ०.५, वडगाव ०.८, लोणी ०.३. इंदापूर - इंदापूर १.५, बावडा ०.३, काटी ०.४, निमगाव ०.५, सणसर ०.३. दौंड - देऊळगाव २.८, राहू २.३, दौंड १.०. पुरंदर -  भिवंडी १.८, कुंभारवळण ०.५, परिंचे २.०.  


इतर बातम्या
खानदेशात तिसऱ्या दिवशीही रिमझिम सुरूचजळगाव : खानदेशात मागील तीन दिवस सतत रिमझिम सुरू...
सोलापूर जिल्ह्यात भिज पाऊस, जोर नाहीचसोलापूर  ः गेल्या अनेक दिवसांपासूनच्या...
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
वऱ्हाडात पावसाची संततधार सुरूअकोला ः मागील दोन दिवसांपासून वऱ्हाडात पाऊस...
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
गाव करतेय गवतांचे संवर्धन शाश्वत प्रगतीच्या मार्गावर निघालेले...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...