मुंबई, कोकणात पावसाचा दणका; विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी

पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने मुंबईसह कोकणात पावसाने दणका दिला आहे. बुधवारी (ता.१५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबई, रायगड, डहाणू, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी तर विदर्भातील बुलडाणा, नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जोरदार पावसामुळे पळसोबढे- अन्वी मिर्झापुर मार्गावरील शेतातील विहीर अशी काठोकाठ भरली.
जोरदार पावसामुळे पळसोबढे- अन्वी मिर्झापुर मार्गावरील शेतातील विहीर अशी काठोकाठ भरली.

पुणे  : मॉन्सून सक्रिय झाल्याने मुंबईसह कोकणात पावसाने दणका दिला आहे. बुधवारी (ता.१५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबई, रायगड, डहाणू, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी तर विदर्भातील बुलडाणा, नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. लोअर परळ, वरळी, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल या भागात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहेत. तर उपनगरात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्गात सकाळपासूनच पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे.

वऱ्हाडात बाळापूर, तेल्हारा तसेच बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव या तालुक्यांना पावसाने झोडपून काढले आहे. या तालुक्यांमधील अनेक मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र नदी-नाल्यांना पूर वाहत आहेत. अनेक शेतांमधून पाणी वाहल्याने उगवलेली पिके खरडून गेल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. निमकर्दा (ता. बाळापूर) येथील एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला. बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा प्रकल्पाचे एक गेट खुले करण्यात आले आहे. पूर्णा नदीवर असलेल्या घुंगशी बॅरेज प्रकल्पातून पूर्णा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून बहुतांश भागात पाऊस पडत आहेत. चिचोंडी (ता. नगर) मिरी, (ता. पाथर्डी) व एरंडगाव (ता. शेवगाव) मंडळांत अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील माहूर, किनवट तालुक्यातील मंडळांमध्ये पावसाचा जोर होता. परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, पालम तालुक्यात, तसेच हिंगोली जिल्ह्यातही हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड, जालना, औरंगाबाद व बीड जिल्ह्यातील काही मंडळांत पावसाने हजेरी लावली.

बुधवारी (ता.१५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - हवामान विभाग) : कोकण : कुलाबा १२२, सांताक्रुझ ९७, डहाणू १२८, अलिबाग १२३, भिरा ७०, माणगाव ५७, म्हसळा ६५, मुरूड ७७, पोलादपूर ७१, रोहा ११४, श्रीवर्धन ८२, सुधागडपाली ५८, उरण ५७, चिपळूण ८०, दापोली ११७, गुहागर ५७, हर्णे ८९, खेड ९३, लांजा ८०, मंडणगड ७६, रत्नागिरी १०१, संगमेश्वर ५१, देवगड ८१, कुडाळ ५५, मालवण १२१, मुलदे (कृषी) ५२, रामेश्वर १०९, सावंतवाडी ७६, वेंगुर्ला ९०. मध्य महाराष्ट्र : नगर ५१, पाथर्डी ७१, शेवगाव ६४, गगनबावडा ७३, तळोदा ३७, महाबळेश्वर ५०. मराठवाडा : कन्नड ३४, पैठण ३९, अंबाजोगाई ४०, केज ४५, शिरूर कासार ३८, आंबड ४६, भोकरदन ४०. विदर्भ : अकोट ३०, बाळापूर ८२, पातूर ३०, अंजनगाव ३०, चांदूर रेल्वे ४०, मोर्शी ३१, नांदगाव काझी ३५, तिवसा ४५, वरूड ३१, भंडारा ४७, पवनी ६०, साकोली ६७, तुमसर ३२, खामगाव ४०, संग्रामपूर ४६, शेगाव १०९, भद्रावती ३८, गोंडपिंपरी ५१, कोर्पणा ३१, पोंबुर्णा ३१, राजूरा ५०, भामरागड ३६, अर्जुनी मोरगाव ३०, सडकअर्जुनी ५९, हिंगणा ९०, कळमेश्वर ३२, कामठी ४८, काटोल ६९, कुही ३८, मौदा ३१, नागपूर १०१, नरखेडा ५२, आर्वी ४३, आष्टी ६०, खारंघा ७७, सेलू ५९, वर्धा ३३८, अर्णी ५८, बाभुळगाव ३१, दिग्रस ३२, घाटंजी ४२, कळंब ५३.   १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे : कुलाबा १२२ (मुंबई), डहाणू १२८, अलिबाग १२३, रोहा ११४ (जि. रायगड), दापोली ११७, रत्नागिरी १०१ (जि. रत्नागिरी), मालवण १२१, रामेश्वर १०९ (जि. सिंधुदुर्ग), शेगाव १०९ (जि. बुलडाणा), नागपूर १०१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com