सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाचा जोर

पुणे : मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर कोकणात दडी मारलेल्या पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारपासूनच सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली .
चांदवड तालुक्यातील पूर्व भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे दरसवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर कांगुणे यांच्या शेतातून असे पाणी वाहिले.
चांदवड तालुक्यातील पूर्व भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे दरसवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर कांगुणे यांच्या शेतातून असे पाणी वाहिले.

पुणे  : मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर कोकणात दडी मारलेल्या पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारपासूनच सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून, पावसामुळे भातलागवडीच्या कामांना वेग येणार आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यातील हतनूर आणि बोरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.     

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी (ता.२) रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्रभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. शुक्रवारी दिवसभर पावसाच्या सरी सुरू होत्या. मालवण येथे सर्वाधिक १९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी, राजापूर येथे पावसाचा जोर अधिक होता. पावसामुळे रखडलेल्या भात लागवडीच्या कामांना पुन्हा आरंभ झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील बोरी व हतनूर प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या मध्यम प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने प्रकल्पातील आवक वाढली आहे. मध्य प्रदेश व विदर्भात पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली. धरणाच्या ३२ दरवाजांमधून ३० हजार ५१६ क्‍युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. पारोळा तालुक्‍यातील बोरी प्रकल्पाचे दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले होते. कनोली नदीदेखील प्रवाही झाली आहे. 

शुक्रवारी (ता.३) राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत : हवामान विभाग) : कोकण : अलिबाग ४७, मुरूड ४७, श्रीवर्धन ६२, हर्णे ६०, राजापूर ९२, रत्नागिरी १२९, देवगड ४०, दोडामार्ग १८१, कणकवली १८४, कुडाळ १४५, मालवण १९७, मुलदे १७४, रामेश्वर ७९, वैभववाडी ७७, वेंगुर्ला १२८, मध्य महाराष्ट्र : चाळीसगाव ३३, आजरा ३७, चंदगड, गगनबावडा ७२, पन्हाळा २०, राधानगरी ३९.  मराठवाडा : आष्टी २०, कळमनुरी ५५, निलंगा २०, हादगाव २२, माहूर ५५, सेलू ३४.  विदर्भ : साकोली २०, चिमूर २१, गडचिरोली ४२, कामठी ३०, नागपूर २७, देवळी २३, हिंगणघाट २९.२, मालेगाव २०, रिसोड २६ , कळंब ३७, वणी २३. 

१०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे :  मालवण १९७, कणकवली १८४, दोडामार्ग १८१, मुलदे १७४, कुडाळ १४५, वेंगुर्ला १२८ (जि. सिंधुदुर्ग), रत्नागिरी १२९ (जि. रत्नागिरी).    कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा सर्वसामान्य स्थितीत असलेला मॉन्सूनची आस, गुजरात आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती, यातच अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने आज (ता.४) कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  विदर्भातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com