Farmer Agricultural News highest rate for black gram in market committee Jalgaon Maharashtra | Agrowon

जळगावात उडदाला ७५०० रुपये क्विंटल दर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

जळगाव ः गेल्या दोन-तीन दिवसांत जळगाव बाजार समितीत उडदाच्या दरात व आवकेत काहीशी वाढ झाली असून, मंगळवारी (ता.२९) दोन अडतदारांकडे दर्जेदार उडदाला उच्चांकी म्हणजेच ७५०० रुपये क्विंटलचा दर मिळाला.

जळगाव  ः एकीकडे अतिपावसाने उडदाचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे उडदाचे दर मळणी सुरू असतानाच कमी झाले होते. परंतु, गेल्या दोन-तीन दिवसांत जळगाव बाजार समितीत उडदाच्या दरात व आवकेत काहीशी वाढ झाली असून, मंगळवारी (ता.२९) दोन अडतदारांकडे दर्जेदार उडदाला उच्चांकी म्हणजेच ७५०० रुपये क्विंटलचा दर मिळाला. या हंगामात उडदाला मिळालेला हा सर्वाधिक दर आहे. 

जळगाव बाजार समिती जिल्ह्यात सर्वात मोठी आहे. या बाजार समितीतील अडतदारांकडे शेतकरी आपले धान्य विक्रीसाठी आणत आहेत. रोजचे लिलाव बंद असले तरी गेल्या चार-पाच दिवसांत उडदाच्या दरात वाढ झाली आहे. मध्यंतरी १५०० ते ३२०० रुपये क्विंटल असा दर होता. त्यात हळूहळू वाढ झाली. या आठवड्यात शेतकऱ्यांकडील आवक वाढली आहे. ती प्रतिदिन १२० क्विंटल एवढी झाली आहे. जामनेर, भुसावळ, जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, जालना जिल्ह्यातूनही उडीद येत आहे. दर्जेदार उडीद कमी आहे.

पण अतिशय कमी दर्जाच्या उडदासही किमान २५०० रुपये क्विंटलचा दर मिळाला आहे. काहीसा लालसर रंग, बारीक उडदाला ४००० रुपये क्विंटलचे दर आहेत. अतिपावसामुळे दर्जेदार उडीद कमी येत आहे. परंतु काही लहान शेतकऱ्यांनी मेहनतीने उडीद पीक कापून घरी आणले. घरी शेंगा तोडून त्या वाळविल्या. यात मजुरी अधिक द्यावी लागली. परंतु बऱ्यापैकी दर्जेदार उडीद उत्पादन घेणे शक्य झाले. या उडदाची विक्री काही शेतकरी बाजारात करीत आहे. 

जळगाव बाजार समितीत मुगाचे दर २५०० ते ८००० रुपये क्विंटल आहेत. दर्जा खराब असल्याचे कारण अडतदार सांगत आहेत. यावल, जळगाव भागातील काही शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी चोपडा, अमळनेर भागात घेवून जात आहेत. तेथेही दर कमी आहेत. या आठवड्यात उडदाची सरासरी प्रतिदिन चार हजार क्विंटल आवक जळगाव, चोपडा व अमळनेर येथील बाजारात झाली आहे.  अमळनेर, चोपडा येथील बाजारातही उडदाच्या दरात सुधारणा झाली आहे.


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...