Farmer Agricultural News Impact of corona in twenty two districts Pune Maharashtra | Agrowon

महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये `कोरोना`चा प्रभाव

योगिराज प्रभुणे
मंगळवार, 7 एप्रिल 2020

पुणे : निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला जेमतेम २८ दिवसांत कोरोन विषाणूच्या संसर्गाने विखळ्यात घेतले. मुंबई, पुणे आणि ठाणे या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचे ८६ टक्के रुग्ण आहेत. उर्वरित महाराष्ट्रात १४ टक्के रुग्णांची नोंद आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीच्या विश्‍लेषणवरून हे निष्कर्ष निघाले.

पुणे : निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला जेमतेम २८ दिवसांत कोरोन विषाणूच्या संसर्गाने विखळ्यात घेतले. मुंबई, पुणे आणि ठाणे या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचे ८६ टक्के रुग्ण आहेत. उर्वरित महाराष्ट्रात १४ टक्के रुग्णांची नोंद आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीच्या विश्‍लेषणवरून हे निष्कर्ष निघाले.

राज्यातील पहिल्या रुग्णांची नोंद पुण्यात ९ मार्चला झाली. त्यानंतर रोज राज्याच्या वेगवेगळ्या भागात कोरोनाचा रुग्ण मिळत गेला. सुरवातीला परदेशातून आलेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यानंतर परदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील लोकांना कोरोना झाल्याचे निदान होऊ लागले. पण, आता सापडत असलेल्या बहुतांश रुग्णांना नेमक्‍या कोणत्या रुग्णापासून (इंडेक्‍स पेशंट) संसर्ग झाला, निश्‍चित याची माहिती मिळविणे कठिण होत गेले आहे. तसे निरीक्षणही सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकारी नोंदवत आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या २८ दिवसांमध्ये राज्यातील ३६ पैकी २२ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्णांची नोंद झाली आहे. उर्वरित १४ जिल्हे अद्यापपर्यंत कोरोनामुक्त असल्याची माहिती मिळाली.

कोकण, मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या प्रादेशिक विभागांपैकी मुंबई आणि पुण्याचा समावेश असलेल्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक आहे. मुंबई उपनगर आणि रायगड वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत. मध्य महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये अद्यापपर्यंत एकाही रुग्णांची नोंद नाही. मात्र, मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नगर जिल्ह्यांमध्ये रुग्ण आहेत. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भातील जिल्ह्यांपैकी निम्म्या जिल्ह्यात रुग्णांची नोंद आहे.

मुंबई, पुणे आणि ठाण्यात अधिक रूग्ण
राज्यात सोमवारी (सहा एप्रिल) सकाळपर्यंत आढळलेल्या ७८१ रुग्णांपैकी ६० टक्के (४६९) रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. त्या खालोखाल पुण्यात १५ टक्के (११९) रुग्णांची नोंद झाली आहे. ठाण्यात ११ टक्के (८२) रुग्ण आढळले. या तीनही शहरांमध्ये मिळून ८६ टक्के रुग्णांची नोंद सार्वजनिक आरोग्य खात्यात आहे. उर्वरित १९ जिल्ह्यांमधून १४ टक्के रुग्णांना कोरोनाच्या निदान झाले असल्याचा निष्कर्षही निघतो.

जगाच्या तुलनेत महाराष्ट्र
लोकसंख्येची घनता सर्वाधिक असूनही महाराष्ट्रात युरोपियन राष्ट्रांच्या तुलनेत कोरोनाचे रुग्ण किमान ६ एप्रिलपर्यंत सर्वाधिक कमी आहेत. सरकारी पातळीवर तत्काळ केलेल्या उपाययोजना आणि जनजागृती ही कारणे असू शकतात. त्याचवेळी, महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण अद्यापी कमी असल्याकडेही तज्ज्ञ लक्ष वेधतात.

 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...