Farmer Agricultural News Impact on sale and purchase of animals due to market close satara Maharashtra | Agrowon

बाजार बंद असल्याने जनावरे खरेदी -विक्रीवर परिणाम 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 एप्रिल 2020

दुधाचे दर कमी झाल्याने मिळणाऱ्या मोबदला चारा व पशुखाद्यासाठी पुरत नाही. बाजार बंद असल्यामुळे जनावरांची खरेदी - विक्री करता येत नाही. जनावरे कशी सांभाळायची हा प्रश्न आहे. 
- निलेश धुमाळ, दूध उत्पादक शेतकरी, सोनके, जि. सातारा. 

पिंपोडे बुद्रुक, जि. सातारा  : ‘कोरोना’मुळे मोठ्या शहरांतून मागणी घटल्याने दुधाचे दर कोसळले आहेत. त्यातच संचारबंदीमुळे जनावरांचे बाजार बंद झाल्याने त्याचा परिणाम जनावरांच्या खरेदी-विक्रीवर झाला आहे. जनावरे सांभाळता येईनात आणि विकताही येत नाहीत, अशा दुहेरी स्थितीमुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दुधाला मिळणाऱ्या कमी दरामुळे व्यवसायात गुंतवलेले भांडवलही निघत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. 

ग्रामीण भागात शेतीपूरक म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पाच महिन्यांपासून दुधाला ३२ रुपये प्रतिलीटर दर मिळत असल्याने अनेक तरुणांनी कर्ज काढून, तसेच शासकीय योजनेतून गाई खरेदी केल्या आहेत. अनेकांचे प्रपंच या व्यवसायावर चालतात. मात्र, ‘कोरोना’मुळे सर्वच मोठ्या शहरांमधून दुधाला मागणी घटली आहे. दुग्धजन्य पदार्थांनाही अपेक्षित मागणी नाही. त्यामुळे डेअरी चालकांनी दुधाचे दर कमी केले. याचा फटका दूध व्यवसायाला बसला आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...