परभणीत मूग, उडदाचा पीकविमा परतावा मंजूर

परभणीत मूग, उडदाचा पीकविमा परतावा मंजूर
परभणीत मूग, उडदाचा पीकविमा परतावा मंजूर

परभणी  ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०१९-२० मधील मूग, उडदाच्या नुकसानीसाठी भारतीय कृषी विमा कंपनीने परभणी जिल्ह्यातील ६५ हजार ४६२ शेतकऱ्यांना ११ कोटी ९५ लाख ८३ हजार ४२२ रुपयांचा परतावा मंजूर केला आहे. त्यात ४९ हजार ४८३ शेतकऱ्यांना मुगाचा ९ कोटी ६३ लाख ८७ हजार ८७८ रुपये आणि १५ हजार ९७९ शेतकऱ्यांना उडदाचा २ कोटी ३१ लाख ९५ हजार ५४३ रुपये परतावा मिळणार असून ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली जात आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

२०१९-२० मधील खरीप हंगामात जिल्ह्यात मुगाची २६ हजार ८७९ हेक्टरवर पेरणी झाली होती. १ लाख ७८ हजार १३० शेतकऱ्यांनी २ कोटी ८५ लाख ८ हजार ९८८ रुपयांचा विमा हप्ता भरून ७४ हजार ७१७ हेक्टरवरील मुगासाठी १४२ कोटी ५४ लाख ४९ हजार ४२४ रुपये रकमेचे विमा संरक्षण घेतले होते. उडदाची ७ हजार ४२१ हेक्टरवर पेरणी झाली होती. ७२ हजार ९९८ शेतकऱ्यांनी ९३ लाख ५८ हजार ३५८ रुपये विमा हप्ता भरून २४ हजार ५३५ हेक्टरवरील उडदासाठी ४६ कोटी ७९ लाख १७ हजार ४२८ रुपये रकमेचे विमा संरक्षण घेतले होते. मूग आणि उडदाचे पीक शेंगामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाचा खंड पडला. 

परिणामी, उत्पादनात मोठी घट आली. विमा कंपनीने जिल्ह्यातील ३८ महसूल मंडळांपैकी मूग आणि उडदासाठी प्रत्येकी १२ मंडळातील शेतकऱ्यांना परतावा मंजूर केला आहे. मूग आणि उडदाच्या पेरणी क्षेत्रापेक्षा विमा संरक्षित क्षेत्र जास्त असल्यामुळे क्षेत्र सुधार गुणांक लागू झाला. परिणामी, अनेक मंडळांतील शेतकऱ्यांना कमी दराने परतावा मंजूर करण्यात आला, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

मंडळनिहाय मूग पीकविमा परतावा लाभार्थी शेतकरी, रक्कम (कोटी रुपये)
मंडळ   संरक्षित क्षेत्र  प्रतिहेक्टरी परतावा एकूण रक्कम शेतकरी संख्या
परभणी  १६२३  ३३०.८९  ०.५३७१४१ २३२१
जांब  २६९५ २६४३.०४ ०.७१२१४५ ४४६७
पेडगाव १९३८ २६४३.०४ ०.५१२२२२० ३२६६
झरी २०५१.२ ४४११.४९  ०.९०४८८५७  ३५७५
बोरी २१८७  ६०७२.६६ १.३२८१५३३ ४५०४
जिंतूर   १२५१ ५६५९.६९ ०.७०८३३९३ ३४४४
सावंगी म्हाळसा  १२१८  ५६५९.६९ ०.६८९३७९३   ३७५६
चारठाणा १४१५  ६५१७.०४   ०.९२२५२७२ ३८६२
चिकलठाणा  २१८६ १२१५४.०६  २.६५७१८७९ ५६७६
 कुपटा १४४३ २५००.९५  ०.३५८६६६७  ३०२२
वालूर २१६५ २५००.९५ ०.५४१६३४८  ४५८९
मानवत ४३३९  ५७५.५८  ०.२४९७६२४ ७०२१
 मंडळनिहाय उडीद पीकविमा परतावा लाभार्थी शेतकरी, रक्कम ( लाख रुपये)
मंडळ  संरक्षित क्षेत्र   प्रतिहेक्टरी परतावा  एकूण रक्कम शेतकरी संख्या
 परभणी २९०.३३  १२४८.२२  ३.६२३९५  ५७९
पिंगळी १९८.७४  १२४८.२२  २.४८०७६ ४३९
सिंगणापूर  २०२.२९ २४८.२२  २.५२५०२ ५०६
दैठणा ४२५.०९ १२४८.२२ ५.३०६१५ १३०२
जांब  ५४०.४ १२४८.२२    ६.७४५३८   १२३९
पेडगाव ४८७.६८ १२४८.२२   ६.०८७३४ १११०
चारठाणा  १०५०.१६ ८३८६.७६  ८८.०७५०७ ३०९२
कोल्हा २२७.७९ २१९१.३७ ४.९९१७३ ५८४
मानवत  ६५०.४७ २१९१.३७  १४.२५४२२ १४४१
केकरजवळा  ४०३.४९ २१९१.३७ ८.८४२०९ ९७५
सोनपेठ   ६८९.९७  ५३७०.५८  ३७.०५५७१  १८००
आवलगाव  ९६७.६४  ५३७०.५८   ५१.९६७९६ २९१२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com