Farmer Agricultural News Interest rebates for regular borrowers from district bank Satara Maharashtra | Agrowon

सातारा जिल्हा बँकेकडून नियमित कर्ज भरणाऱ्यांना व्याज सवलत 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

सातारा : अवकाळी पाऊस व ‘कोरोना’च्या संकटामुळे शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते व व्याज भरणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे द्राक्षबाग लागवड, कुक्कुटपालन, कृषी पर्यटन प्रकल्पाचे कर्जाचे जुलै २०१९ ते २०२० जून या कालावधीत नियमित कर्ज हफ्ते भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने मार्च २०२० च्या नफ्यातून व्याज सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

सातारा : अवकाळी पाऊस व ‘कोरोना’च्या संकटामुळे शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते व व्याज भरणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे द्राक्षबाग लागवड, कुक्कुटपालन, कृषी पर्यटन प्रकल्पाचे कर्जाचे जुलै २०१९ ते २०२० जून या कालावधीत नियमित कर्ज हफ्ते भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने मार्च २०२० च्या नफ्यातून व्याज सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

ते म्हणाले, की दुष्काळात पाणीटंचाईच्या काळात दुष्काळग्रस्त भागात टँकरने पाणी वितरणासाठी बँकेने दोन कोटी खर्च करून जनतेला दिलासा दिला आहे. यावर्षी ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून बॅंकेने एक कोटीची मदत मुख्यमंत्री साहाय्यता निधीस केली आहे. मोलमजुरी करून काम करणारे मजूर व गरजू कुटुंबांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी जीवनावश्‍यक अन्नधान्याचे किट उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व ‘कोरोना’ संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. द्राक्षबाग लागवड, कुक्कुटपालन व कृषी पर्यटन प्रकल्प उभारणीसाठी शेतकऱ्यांना बँकेने मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा केला आहे. या कर्जदार शेतकरी सभासदांना जिल्हा बँकेकडून वसूलपात्र हप्ते वरील व्याजाची नियमित परतफेड करणाऱ्या कर्जदारांना सवलत देऊन आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...