Farmer Agricultural News Jillha Parishad gives fund for marriage of daughter Akola Maharashtra | Agrowon

अकोला झेडपी देणार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी मदत

टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

अकोला  ः नापिकी, कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. घरातील कर्तापुरुष निघून गेल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकरी आत्महत्याग्रस्त किंवा नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला जिल्हा परिषदेमार्फत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी अकोला जिल्हा परिषद २१ हजार रुपयांची मदत करणार आहे.

अकोला  ः नापिकी, कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. घरातील कर्तापुरुष निघून गेल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकरी आत्महत्याग्रस्त किंवा नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला जिल्हा परिषदेमार्फत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी अकोला जिल्हा परिषद २१ हजार रुपयांची मदत करणार आहे.

अकोला जिल्हा परिषदेत काही दिवसांपूर्वी नवीन पदाधिकारी सत्तारूढ झाले. त्यानंतर कृषी समितीची पहिलीच सभा सोमवारी (ता. २४) सभापती पंजाबराव वढाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी समितीचे सचिव तथा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मुरलीधर इंगळे तसेच अन्य सदस्य उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा परिषद कृषी समितीचे सुधारीत व मूळ बजेट वाढवून आता तीन कोटी करण्यात आले आहे. या निधीतून जिल्ह्यातील सर्वसाधारण शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर विविध घटकांचा लाभ दिला जाणार आहे.

यात प्रामुख्याने प्लॅस्टिक ताडपत्री पुरवठा, रिचार्जेबल टॉर्च, बॅटरी ऑपरेटेड पॉवर स्प्रे, एचडीपी पाइप, पीव्हीसी पाइप, सोयाबीन स्पायरल सेपरेटर, सबमर्सिबल पंपाचे वाटप केले जाणार आहे. या सोबतच आत्महत्याग्रस्त किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत पावलेल्या शेतकरी व शेतमजुराच्या कुटुंबातील मुलीचे लग्न होणार असेल तर त्याकरिता जिल्हा परिषदेमार्फत लग्नासाठी २१ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाणार आहे. या प्रस्तावाला बैठकीत सर्व सदस्यांनी मंजुरी दिली. 


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...