Farmer Agricultural News Jillha parishad will give fund if accidental death of animals Pune Maharashtra | Agrowon

जनावरांचा अपघाती मृत्यू झाल्यास मदत : पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 एप्रिल 2020

 
जनावरांचा अपघाती मृत्यू झाल्यास महसूल विभागाकडून पंचनामा केला जातो. मात्र, शेतकऱ्यांना ठोस मदत मिळत नाही. शेतकऱ्यांना मदत म्हणून जिल्हा परिषदेकडून ही योजना राबविण्यात येणार आहे. बैल जोडी खरेदीस अनुदान, जनावरांच्या अपघाती मृत्युप्रकरणी मदत यासारख्या योजनांमधून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ होईल.
- बाबूराव वायकर, सभापती, कृषी व पशुसंवर्धन समिती, पुणे जिल्हा परिषद.

पुणे  : नैसर्गिक आपत्ती, अपघातांमध्ये जनावरांचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशावेळी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी अपघातात जनावर दगावल्यास शेतकऱ्याला पाच ते पंधरा हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे या नावीन्यपूर्ण योजनेसाठी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबूराव वायकर यांनी दिली.

पशुसंवर्धन विभागाकडून दुर्गम भागातील आणि शेतीक्षेत्र कमी असलेल्या शेतकऱ्यांना शेती कामांकरिता बैल जोडी खरेदीसाठी ५० टक्के अनुदान देण्याची योजनाही जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणार आहे. वादळी वारे, जोरदार पाऊस, पूर, जळीत, वीज व झाडपडीच्या घटनांमध्ये जनावरांचा मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. यामुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. जनावरांचा अपघाती मृत्यू झाल्यास अपघात विमा शेळी, मेंढी या लहान जनावरांसाठी ५ हजार रुपये, तर गाय, बैल, म्हैस या मोठ्या जनावरांना मृत्यू झाल्यास १५ हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...