Farmer Agricultural News job guarantee scheme status Nagar Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात ‘रोहयो’ची अडीच हजार कामे सुरु

टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 मे 2020

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सध्या अडीच हजार कामे सुरू आहेत. त्याद्वारे १२ हजार जणांना रोजगार उपलब्ध होत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली मागेल त्याला काम देण्याची दक्षता घेतली जात आहे.
- उदय किसवे, उपजिल्हाधिकारी, नगर.

नगर  ः मागेल त्याला काम देण्यासाठी जिल्हाभरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची २४८१ कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याद्वारे ११ हजार ६८२ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. प्रशासनाने २७ हजार ९३८ कामे करण्याची तयारी ठेवली आहे. या कामांद्वारे ८८ लाख तीन हजार दिवसांचा रोजगार मिळणे शक्य आहे.

ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळावा यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. या स्थितीत गरज असेल त्या प्रत्येकाला रोजगार पुरविण्याची पूर्ण तयारी केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हाभरात ग्रामपंचायतींची १६२३ व इतर यंत्रणांची ८५८ अशी २४८१ कामे सुरू करण्यात आली. यावर ११ हजार ६८२ जणांना रोजगार उपलब्ध झाला.

या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरास सरासरी दोनशे सहा रुपये मजुरी प्रतिदिवस मिळत आहे. वृक्षसंगोपन, संवर्धन, निगराणी आदी रोजंदारीच्या कामांबरोबरच ब्रासवर केल्या जाणाऱ्या कामांचा यात समावेश आहे. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतींची १८ हजार ७११ कामे, तसेच इतर यंत्रणांतर्फे ९२१४, अशी एकूण २७ हजार ९२५ कामे करण्याची तयारी ठेवली आहे. या कामांतून जिल्हाभरात ८८ लाख तीन हजार दिवसांचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. जिल्ह्यात ‘कोरोना’चे सावट असतानाही मागेल त्याला काम देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले. रोजगार हमी योजनेच्या कामांची अंमलबजावणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून केली जात आहे.

तालुकानिहाय मजुरांची उपस्थिती ः अकोले ९१९, जामखेड ६९४, कर्जत १४८५, कोपरगाव २३२, नगर ८२५, नेवासे ८२५, पारनेर १०५०, पाथर्डी १०१६, राहाता ७४८, राहुरी ५१६, संगमनेर ९६७, शेवगाव ९०६, श्रीगोंदे ९०७,श्रीरामपूर ६१२.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...