Farmer Agricultural News kardai sowing area decrease nanded maharashtra | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत करडईचा पेरा घटला

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 जानेवारी 2020

नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये यंदाच्या (२०१९) रब्बी हंगामात प्रमुख तेलबिया पीक असलेल्या करडईची ४५१४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. करडईच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा थोडी वाढ झाली असली, तरी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत घट झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये यंदाच्या (२०१९) रब्बी हंगामात प्रमुख तेलबिया पीक असलेल्या करडईची ४५१४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. करडईच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा थोडी वाढ झाली असली, तरी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत घट झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

रब्बी हंगामातील कोरडवाहू क्षेत्रातील प्रमुख गळीत धान्य पीक असलेल्या करडईचे नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्र ४८ हजार १६३ हेक्टर आहे. यंदा आॅक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जमिनीत पेरणीसाठी ओलावा होता. परंतु पेरणीची वेळ निघून गेल्यामुळे करडईच्या क्षेत्रात घट झाली. काही वर्षांपूर्वी या जिल्ह्यांमधील जिरायती क्षेत्रातील शेतकरी रब्बी ज्वारीमध्ये आंतरपीक तसेच सलग पीक म्हणून करडईची पेरणी करत असत. परंतु गेल्या काही वर्षांत या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सोयाबीननंतर शेतकरी रब्बीमध्ये हरभऱ्याला पसंती देत आहेत. त्यामुळे करडई सोबतच सूर्यफूल,जवस आदी रब्बी हंगामातील तेलवर्गीय पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे. गतवर्षी (२०१८-१९) करडईची ३५६९ हेक्टरवर (९.७१ टक्के) पेरणी झाली होती.

नांदेड जिल्ह्यात करडईचे सर्वसाधारण क्षेत्र ४७६८ हेक्टर असून, यंदा १८८८ हेक्टरवर पेरणी झाली. परभणी जिल्ह्यात करडईचे सर्वसाधारण क्षेत्र २५ हजार ७८८ हेक्टर आहे. गतवर्षी २ हजार ७४३ हेक्टरवर पेरणी झाली होती. परंतु यंदा सर्व तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे. करडईच्या एकूण पेरणी क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये करडईचे सर्वसाधारण क्षेत्र १८१८६ हेक्टर आहे. काही वर्षांपूर्वी औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर तसेच परिसरातील शेतकरी करडईचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत असत. गतवर्षी करडईची १७० हेक्टरवर पेरणी झाली. परंतु यंदा मात्र तुरळक ठिकाणी करडईची पेरणी झाली आहे. मात्र त्याची कृषी विभागाकडे नोंद नाही.
 

जिल्हानिहाय तुलनात्मक करडई पेरणी स्थिती (हेक्टर)
जिल्हा  सर्वसाधारण क्षेत्र  २०१८ २०१९
नांदेड  ४७६८ ६५६  १८८८
परभणी २५,२०९ २७४३  २६२७
हिंगोली  १८,१८६ १७० ००

 


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...