सोलापुरात कारहुणवीनिमित्त निघणारी बैलजोडी मिरवणुक रद्द

सोलापूर ः सोलापूर परिसर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या कर्नाटकच्या सीमावर्ती भागात साजरा होणारा कर्नाटकी बेंदूर (कारहुणवी) सण यंदा `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. सोलापुरातील कसबा गणपती शेतकरी मंडळ यादिवशी बैलजोड्यांची मिरवणूक काढते, तीही रद्द करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
संग्रहित छायाचित्र

सोलापूर परिसर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा तालुक्यात ज्येष्ठ पौर्णिमेस म्हणजे येत्या ५ जूनला कारहुणवी साजरा होणार आहे. बैलपोळ्याप्रमाणे यादिवशी बैलजोड्यांना सजवून मिरवणूक काढण्यात येते. त्यासाठी पंधरा दिवस आधीपासून खरेदीची धामधूम बाजारात असते, या भागातील शेतकऱ्यांकडे या सणासाठी एखाद्या उत्सवाप्रमाणे तयारी सुरु असते. पण यंदा ‘कोरोना’मुळे सगळे गणित बिघडले आहे. बाजारपेठा बंद आहेतच, पण मिरवणूक आणि त्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे या मिरवणूकाच रद्द करण्यात आल्या आहेत. सोलापुरातील बाळीवेस येथील कसबा गणपती शेतकरी मंडळाच्या वतीने यंदा सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी यंदा स्वत:च्या घरात पुजा करुन किंवा शेतात हा सण साजरा करावा, असे आवाहनही मंडळाने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com