Farmer Agricultural News kharip planning starts Satara maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात खरिपाची तयारी सुरू

टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 एप्रिल 2020

खरीप हंगामासाठी खते, बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. सोयाबीन बियाणे प्रत्येक वर्षी नवीन खरेदी न करता घरातील बियाणे वापरावे. तसेच या बियाण्याची उगवण क्षमता तपासून पेरणी केली जावी. तसेच निविष्ठांचा काळा बाजार होऊ नये यासाठी १२ भरारी पथकेही सज्ज आहेत
- विनायक पवार, कृषी विकास अधिकारी, सातारा.

सातारा -ः खरीप हंगाम अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपल्याने कृषी विभागाने हंगामाची तयारी सुरू केली आहे. खरिपातील पेरणीसाठी ४७ हजार ८०४ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहेत. तसेच एक लाख ३० हजार टन खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू झाले आहे. खरिपात तीन लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज आहे. यासाठी लागणारे बियाणे व खतांची मागणी करण्यात आली आहे. तीन लाख ३५ हजार क्षेत्रासाठी ४७ हजार ८०४ क्विंटल बियाण्यांची गरज निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार विविध कंपन्यांकडे बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यातील भात, मका, सोयाबीन या पिकांचे दोन हजार ४०९ क्विंटल बियाणे सेवा केंद्रांकडे उपलब्ध झाले असून उर्वरित बियाणे लवकरच उपलब्ध केले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाण्यांची कमरतता भासणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात या हंगामात सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा कल राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सोयाबीनची ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज गृहीत धरून १७ हजार ६३ क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे दरवर्षी खरेदी न करता घरच्याच बियाण्याचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

तसेच हंगामासाठी एक लाख ३० हजार टन खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. यामध्ये युरिआ, डिएपी, एमओपी, एसएसपी, एनपीके खतांचा समावेश आहे. कृषी आयुक्तालयाकडून जिल्ह्यासाठी एक लाख दोन हजार ९२३ टन रासायिनक खतांचा पुरवठा मंजूर करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात सध्या ४१ हजार ९० टन खते उपलब्ध आहेत.
 
जिल्ह्यात १२ भरारी पथके
शेतकऱ्यांना गुणवत्तायुक्त कृषी निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक तालुक्याकरिता एक व जिल्हास्तरावर एक अशी एकूण १२ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या भरारी पथकांमार्फत कृषी सेवा केंद्रांच्या अचानक तपासण्या करण्यात येणार आहेत. तपासणीत अनियमतात किंवा काळाबाजार आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार आहेत.
 
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...