Farmer Agricultural News kharip sowing status in region Pune Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार हेक्टरवर पेरणी 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

पुणे   ः  पुणे विभागात खरिपाचे सरासरी क्षेत्र आठ लाख ६६ हजार ८१९ हेक्टर असून त्यापैकी सात लाख ३४ हजार ५३२ हेक्टरवर म्हणजेच ८४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली आहे. पुरेसा पाऊस झाल्याने पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे विभागातील अनेक भागांत दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी सुरू केली आहे. सध्या विभागात मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पुणे विभागात खरिपाचे सरासरी क्षेत्र आठ लाख ६६ हजार ८१९ हेक्टर असून त्यापैकी सात लाख ३४ हजार ५३२ हेक्टरवर म्हणजेच ८४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली आहे. पुरेसा पाऊस झाल्याने पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

विभागातील नगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. सध्या नगर जिल्हयातील काही भागात खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहे. तर काही ठिकाणी शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतिक्षेत आहे. अकोले तालुक्यात तालुक्यात सुमारे एक हजार ८६२ हेक्टरवर भात रोपवाटिका तयार झालेल्या आहेत.

पुणे जिल्हयामध्ये बाजरी, तूर, मुग, मका, भूईमूग व सोयाबीन पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. काही ठिकाणी अजूनही पेरण्या सुरू आहेत. मावळ,मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात भात व नाचणीची रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी भात पुर्नलागवडीची कामे सुरू झाली आहेत. आत्तापर्यत तीन हजार १८० हेक्टरवर भाताच्या पुर्नलागवडी झाल्या आहेत. सोलापूरमध्ये चांगल्या प्रमाणात पेरण्या झाल्या असून बाजरी, मका, उडीद, मूग, तूर व सुर्यफूल ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी पिकांची उगवण समाधानकारक असली तरी बार्शी तालुक्यातील गौडगाव व उपळे भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवणीबाबत तक्रारी केल्या आहेत. 
 

पुणे विभागात झालेली पेरणी (हेक्टर) 
जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्केवारी 
नगर ४,४७,९०४ ४,२४,६४३ ९४ 
पुणे १,८४,२७४ ९२,२७४ ५० 
सोलापूर २,३४,६४१ २,१७,६१५ ९२ 
एकूण ८,६६,८१९ ७,३४,५३२ ८४ 

 


इतर बातम्या
बाजार समित्यांपुढे स्पर्धेचे आव्हान पुणे ः केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक बाजार'...
धक्कादायक, सरकारी समित्यांमध्ये ...पुणे: पीकविमा योजनेसहित कृषी योजने संबंधित सर्व...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या...पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सर्व शेतीमाल संपूर्ण नियमनमुक्त ! ‘एक...पुणे ः सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायमकोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...
राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
किसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...
नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...