Farmer Agricultural News kokan agriculture university take initiative for new varieties of Niger seeds Ratnagiri Maharashtra | Agrowon

कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या नव्या जाती विकसित करणार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

दापोली, जि. रत्नागिरी ः कारळा (काळे तीळ) पिकाच्या पारंपरिक जातींच्या संवर्धनाबरोबरीने अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित जातींच्या संशोधनासाठी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. 

दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी कालावधी आणि अत्यल्प खर्चातून चांगले उत्पन्न देणारे कारळा (काळे तीळ) पीक दापोली, मंडणगड तालुक्यातून दुर्मीळ होत चालले आहे. हे लक्षात घेऊन पारंपरिक जातींच्या संवर्धनाबरोबरीने अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित जातींच्या संशोधनासाठी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. 

खरीप हंगामात डोंगर उतारावरील खाचरात पेरलेल्या कारळा पिकाची पिवळीधम्मक फुले भाद्रपद, आश्विन महिन्यात निसर्गाला वेगळे रूप देतात. परंतु, अलीकडे या पिकाची लागवड कमी होत चालली आहे. कोकणातील काही शेतकऱ्यांकडे कारळ्याच्या पारंपरिक जाती टिकून आहेत. या पिकाचा व्यवस्थापन खर्च कमी आहे. याचे तेल आणि पेंडीला चांगली मागणी आहे. त्यामुळे या पिकाच्या नव्या जातींबाबत कृषी विद्यापीठाने संशोधन करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याची दखल डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने घेतली असून याबाबत संशोधनाला गती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया

दापोली, मंडणगड तालुक्यातील कारळा उत्पादक शेतकऱ्यांकडे असलेल्या पारंपरिक जातींचे संवर्धन आणि सुधारित जातींच्या विकासाबाबत विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. कारळा पिकाचे आहारातील महत्त्व लक्षात घेता शेतकऱ्यांच्या बरोबरीने याचे लागवड क्षेत्र वाढविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.
- डॉ. पराग हळदणकर, संशोधन संचालक, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली


इतर अॅग्रो विशेष
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...