पुणे जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात

कर्जमुक्ती योजनेच्या यादीतील तपशील तपासताना शेतकरी.
कर्जमुक्ती योजनेच्या यादीतील तपशील तपासताना शेतकरी.

पुणे  ः जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत १ लाख ५६ हजार ४८० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात बारामती व पुरंदर तालुक्यातील गावांची निवड करण्यात आली आहे. सोमवारी (ता. २४) कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर होताच जिल्हा बॅंकेच्या बारामती तालुक्यातील मोरगाव आणि पुरंदर तालुक्यातील सासवड येथील शाखेत शेतकऱ्यांनी यादीतील तपशिलाची तपासणी केली.

पुणे जिल्हा बॅंकेच्या सुमारे एक लाख ३६ हजार शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. याशिवाय इतर बॅंकांकडील शेतकऱ्यांची यादी वेगळी आहे. कर्जमाफी योजनेतंर्गत यादी जाहीर होताच जिल्हा बँकेच्या सासवड शाखेतील गुलाब जगताप, मारुती शिंदे, प्रल्हाद खोमणे, चंद्रकांत जगताप, शंकर बोरावके, सुभद्रा होले, द्रोपदाबाई शिंदे, भारत जगताप, सुखदेव जगताप, अशोक जगताप, मनोहर जगताप, दिलीप गिरमे, लक्ष्मी कोंडे, अभिजित लांडगे, नारायण जगताप, विठ्ठल शिंदे, राजेंद्र जगताप या शेतकरी सभासदांची नावे तपासण्यात आली.  या वेळी विभागीय सह निबंधक संगीता डोंगरे, जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक कुंभार, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, सहायक निबंधक मनोज कुमार गायकवाड, अमर गायकवाड, गिरीश जाधव, विजय शिवले, विभागीय अधिकारी सुरेश चव्हाण, उत्तम शिंदे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com