राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : कोरोना विषाणूला अटकाव घालण्यासाठी राज्यात मंगळवारनंतर (ता.१४) देखील लॉकडाउन कायम असणार आहे. किमान ३० तारखेपर्यंत हा लॉकडाउन राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (ता.११) केली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई  : कोरोना विषाणूला अटकाव घालण्यासाठी राज्यात मंगळवारनंतर (ता.१४) देखील लॉकडाउन कायम असणार आहे. किमान ३० तारखेपर्यंत हा लॉकडाउन राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (ता.११) केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. वर्षा निवासस्थानाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यात सहभागी होऊन संवाद साधला. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शनिवारी संध्याकाळी पाच वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधत लॉकडाउन संदर्भात घोषणा केली.  

यावेळी श्री. ठाकरे म्हणाले, की राज्यातील मुंबई, पुणे आणि इतर काही शहरात ‘कोरोना’ची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे ‘कोरोना’वर संपूर्ण मात करण्यासाठी हा लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा लॉकडाउन किमान ३० एप्रिलपर्यंत असेल. किमान अशासाठी की नागरिकांनी कुठेही गर्दी केली नाही तरच कोरोना नियंत्रणात येईल आणि मग हा लॉकडाउन आपण हटवू शकतो. या वाढलेल्या कालावधीचे स्वरूप कसे असेल, मजूर व कामगारांचे काय, तसेच उद्योगांसाठी काय करायचे या बाबी मंगळवारपर्यंत (ता.१४) स्पष्ट केल्या जाणार आहे.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढते आहे. पुणे हे कोरोना संसर्गाचे प्रवेशद्वार ठरलं. त्यावेळी आपल्याला ज्या देशांची यादी मिळाली तेथून आलेल्या नागरिकांची आपण तपासणी केली. मात्र, काही देशांमधून आलेल्या नागरिकांची तपासणी झाली नाही आणि कोरोनाचा संसर्ग वाढला. आता ज्या परिसरात रुग्ण आढळले ते परिसर सील करण्यात येत आहेत. आता कोरोनाबाबत रुग्णांची त्यांच्या घरी जाऊन चाचणी घेत आहोत.

आत्तापर्यंत राज्यात ३३ हजार चाचण्या झाल्यात. केवळ मुंबईत १९ हजार चाचणी झाल्या आहेत. त्यात १००० रुग्ण आढळले. मात्र, या रुग्णांमध्ये सूक्ष्म ते अतिसूक्ष्म लक्षणे आहेत. केवळ ६० ते ७० टक्के लक्षणे असल्याने त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडले जात आहे. आपण कोरोना संसर्गाचा वेग मंद राखण्यात यशस्वी झालो आहोत. मात्र, मला ही रुग्णांची संख्या शून्य करायची आहे. आता कोरोनाग्रस्त रुग्णांची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतो आहे. जगभरात यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले. 

आजपर्यंत जनतेने जे धैर्य दाखवलं आणि आपल्या सरकारवर विश्वास दाखवला त्याबद्दल मी आभारी आहे. सर्व देशात वेगवेगळ्या पक्षांचे मुख्यमंत्री आहेत. मात्र ते एकत्र येऊन ‘कोरोना’शी लढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत आहोत. यात राजकारण नको. यातून बाहेर पडून नक्कीच आपण जागतिक महासत्ता बनू शकतो, असे श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले.

‘शेतीकामांवर निर्बंध नाहीत’ लॉकडाउन जरी कायम ठेवला असला तरी आपल्याला आता एकूण परिस्थितीचे गांभीर्य कळले आहे. आपण आजपर्यंत लॉकडाउनमध्ये देखील शेतीच्या कामांवर कुठलेही निर्बंध आणलेले नाहीत. शेतीविषयीची जी कामे आहेत ती चालू आहेत. शेतीमाल, अवजारे, बियाणे,  खते असे काहीही आपण बंद केलेले नाही आणि यापुढेही करणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरुच राहील, असे श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com