नगर तालुक्यातील १०५ गावांत दरवर्षी आठ दिवस लॉकडाउन

‘कोरोना’मुळे जग थांबलेय. भविष्यातही अशा संकटाला सामोरे जावे लागू शकतो. लॉकडाउनमुळे काही अडचणी तयार झाल्या असल्या तरी प्रदूषण थांबले. यासह अनेक बाबी फायदेशीर असल्याचे जाणवले. त्यामुळे आम्ही दरवर्षी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतलाय. - रामदास भोर, माजी सभापती, पंचायत समिती, नगर
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अचानक लॉकडाउन झाल्याने अनेक समस्या तयार झाल्या खऱ्या. पण धकाधकीच्या जीवनात लॉकडाउनमुळे अनेक फायदेही होत असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे नगर तालुक्यातील १०५ गावे आता दरवर्षी आठ दिवस लॉकडाउन करणार आहेत. नगर तालुका पंचायत समितीच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. हे लॉकडाउन दरवर्षी मे महिन्यात सोयीनुसारच्या काळात होईल. लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवाच फक्त चालू राहतील. याच तालुक्यातील आदर्श गाव हिवरेबाजारने यापुर्वीच असा निर्णय जाहीर केलेला आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यांपासून जग थांबल्याची स्थिती आहे. काही अपवादातील सेवा वगळता सर्व बाबी बंद आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे झालेल्या लॉकडाउनने अनेकांची गैरसोय केली आहे. मात्र लॉकडाउनमुळे अनेक बाबी समोर आल्या. दुरावलेली माणसे एकत्र झाली. वाहने, कंपन्या व अन्य बाबी बंद असल्याने प्रदूषण थांबले. याशिवाय लॉकडाउनमुळे जर अनेक फायदेशीर बाबी होत असतील तर वर्षातून आठ दिवस लॉकडाउन करायला काय हरकत आहे असा मुद्दा गेल्या दोन महिन्यांपासून उपस्थित होत आहे.

नगर तालुका पंचायत समितीची नुकतीच आॅनलाइन मासिक सभा झाली. त्यात माजी सभापती रामदास भोर यांनी दरवर्षी आठ दिवस तालुका लॉकडाउन करण्याबाबत ठराव मांडला आणि सभापती कांताबाई कोकाटे यांना त्याला अनुमोदन देत ठराव मंजूर केला. तालुक्यात १०५ गावे आहेत. या गावांत दरवर्षी कमी कामे असलेल्या मे महिन्याच्या काळात सोयीनुसार लॉकडाउन ठरवले जाईल. पंचायत समितीच्या हद्दीत साडेतीन हजार कर्मचारी आहे. त्यांच्या माध्यमातून हे नियोजन केले जाईल. अत्यावश्यक सेवा सुरु ठेवल्या जातील. लॉकडाउनच्या काळात कोणाचीही गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेण्याचा ठराव पास करण्यात आला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com