Farmer Agricultural News Locusts hit ninety thousand hectares in Rajasthan | Agrowon

टोळधाडीचा राजस्थानमधील ९० हजार हेक्टरला फटका

पीटीआय
शनिवार, 30 मे 2020

जयपूर, राजस्थान  ः राज्यातील २० जिल्ह्यांतील सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्राला टोळधाडीचा फटका बसला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

जयपूर, राजस्थान  ः राज्यातील २० जिल्ह्यांतील सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्राला टोळधाडीचा फटका बसला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

श्री गंगानगर, नागौर, जयपूर, दौसा, कारुली, सवाई माधोपूर भागात नियंत्रणात्मक उपाययोजना केल्यानंतर टोळांच्या झुंडी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशाकडे सरकल्या आहेत. टोळधाडीमुळे श्री गंगानगरमधील ४ हजार तर नागौर जिल्ह्यातील १०० हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण राज्यातील सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्राला टोळधाडीचा फटका बसला असल्याची माहिती कृषी आयुक्त ओम प्रकाश यांनी दिली.

सुमारे ६७ हजार हेक्टर क्षेत्रावर टोळधाड प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात आल्या. टोळधाडीच्या झुंडी १५ ते २० किलोमीटर प्रतितास वेगाने दिवसभरात १५० किलोमीटर प्रवास करतात. सध्या शेतांमध्ये पिके नसल्याने टोळधाडीने झाडे आणि भाजीपाल्यास आपले लक्ष्य केले आहे. सध्या शेतांमध्ये पिके नसल्याने टोळधाड पाकिस्तानातून भारताकडे येत आहेत.

टोळधाड नियंत्रणासाठी फवारणीकरिता ८०० ट्रॅक्टर्स तैनात करण्यात आले आहेत. २०० पथके दैनंदिन सर्वेक्षण करीत असून शेतकऱ्यांना कीटकनाशकांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. जयपूरमधील निवासी भागातील झाडे आणि भिंतींवर सध्या टोळधाडीच्या झुंडी दिसून येत आहे. तसेच काही तासांनंतर त्या दौसाकडे जात असल्याचे श्री. ओमप्रकाश यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेशमध्ये दक्षतेचा इशारा
शिमला ः शेजारील राज्यांमध्ये टोळधाडीने पिकांचे केलेले नुकसान पाहता कांग्रा, उना, बिलासपूर, सोलन या जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला असल्याचे कृषी संचालक डॉ. आर.के. कौंदल यांनी सांगितले. ते म्हणाले, की टोळधाडीच्या झुंडींवर लक्ष ठेवण्याच्या तसेच आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहे. टोळधाड आढळल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे.
 
‘टोळधाड नियंत्रणासाठी ब्रिटनकडून १५ फवारणी यंत्रांची खरेदी’
नवी दिल्ली ः देशाच्या विविध राज्यांमधील टोळधाड नियंत्रणासाठी ब्रिटनकडून १५ फवारणी यंत्रे खरेदी करण्यात आली असून ती येत्या १५ दिवसांत दाखल होतील, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली. श्री. तोमर यांनी देशातील टोळधाडीसंदर्भात नुकतीच उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. केंद्र सरकार टोळधाडबाधित राज्यांच्या संपर्कात असून त्यांना सातत्याने सल्ले देत आहे.

येत्या एक ते दिड महिन्यात अजून ४५ फवारणी यंत्रे खरेदी करण्यात येणार आहेत. उंच झाडे आणि दुर्गम ठिकाणी कीटकनाशके फवारणीसाठी ड्रोनचा उपयोग केला जाईल, तर हवाई फवारण्यांसाठी हेलिकॉप्टर तैनात करण्याचा विचार आहे, असे सूत्रांनी सांगितले. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयालयाने दिलेल्या माहितीनुसार, या टोळधाडीच्या झुंडी पाकिस्तानातून दाखल झाल्या आहेत. यामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेशातील उभे कापूस पीक तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातही राजस्थानला टोळधाडीचा मोठा फटका बसला आहे.
 
राजस्थानमधील टोळधाड दृष्टिक्षेपात

  • २० जिल्ह्यांतील ९० हजार हेक्टरला फटका
  • उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशकडे जात आहेत झुंडी
  • २०० पथकांव्दारे दैनंदिन सर्वेक्षण
  • शेतकऱ्यांना कीटकनाशकांचे मोफत वाटप

इतर बातम्या
कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा...नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतमाल काढणीपश्‍चात...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
‘कृषी अधिकारीच म्हणतात, खतांसंदर्भात...पुणे ः शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासत आहे. कृषी...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...